Shivaji Chumbhale & Devidas Pingale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivaji Chumbhale Politics: दुबईवारी फळाला आली...बाजार समिती सभापतींवरील ‘अविश्वास’ मंजूर!

Shivaji chumbhale; APMC no confidence motion sanction against NCP's Devidas Pingle-नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पुढाकाराने अविश्वास ठराव मंजूर झाला

Sampat Devgire

Devidas Pingle News: बाजार समितीच्या सभापती पदामध्ये काय असते? यावर विचार करायला लावणारी घटना नाशिकला घडली. नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास मंजूर करण्यासाठी विरोधकांनी संचालकांना चक्क दुबई वारी घडवली. नाशिक बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी श्री पिंगळे आणि त्यांचे समर्थक दोन संचालक अनुपस्थित राहिले. बैठकीला उपस्थित सर्व १५ संचालकांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.

नाशिक बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी श्री पिंगळे आणि त्यांचे समर्थक दोन संचालक अनुपस्थित राहिले. बैठकीला उपस्थित सर्व १५ संचालकांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.

बाजार समितीच्या सभापती पदाच्या राजकीय हालचाली या अधिक चिंता आणि चर्चा घडविणारे आहेत. समितीचे १५ संचालक अविश्वास ठरावासाठी प्रतिस्पर्धी गटाचे आणि नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून भाजपवासी झालेले शिवाजी चुंबळे यांच्या गटात सामील झाले. यातील दहा जणांना दुबई वारी घडविण्यात आली. हे संचालक दुबईहून आले आणि त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती त्याच पिंगळे यांच्या विरोधात मतदान केले.

बाजार समितीच्या राजकारणात श्री चुंबळे आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांचे राजकीय वैर अतिशय जुने आहे. बाजार समितीची सत्ता हे त्यातील माध्यम आहे. या दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा सहकार विभाग तसेच पोलिसांतही अनेक तक्रारी झाल्या आहेत विशेष म्हणजे श्री चुंबळे यांच्या जाचाला कंटाळून पिंगळे यांना साथ देणारे संपत सकाळे यावेळी पुन्हा एकदा श्री चुंबळे यांच्या गटात गेले आहे.

येत्या बुधवारी (ता. १९) शिवाजी चुंबळे अथवा त्यांच्या पत्नी बाजार समितीच्या सभापती म्हणून सत्तेत येतील. त्यांच्याकडे गेलेल्या सर्व संचालकांना प्रत्येकी ५० लाख रुपये वाटप करण्यात आल्याची तक्रार श्री पिंगळे यांनी केली होती. हे संचालक सामान्य शेतकरी असून त्यांची दुबई वारी हा देखील चर्चेचा विषय आहे.

यानिमित्ताने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच सत्तेसाठी ओढाताण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी काळातही असेच चित्र विविध संस्थांमध्ये दिसून येईल. सत्तेसाठी आपापलेली अनेक मंडळी या निमित्ताने विरोधी पक्ष सोडून सत्ताधारी महायुतीत गेलेली दिसते.

एका बाजार समितीची सत्ता आणि सभापतीपद यामध्ये अखेर दडले तरी काय आहे? असा प्रश्न अनेक नागरिकांना या निमित्ताने पडला आहे. नाशिक बाजार समिती गेली अनेक वर्षे होती तशीच आहे. तेथील सर्व समस्या होत्या त्याच आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा काय? हेही कोणाला माहित नाही. श्री चुंबळे आणि पिंगळे हे अनुक्रमे सत्तेत राहिले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या विकासासाठी अविश्वास आणला, हा एक राजकीय विनोद म्हणून पुढील काही दिवस कार्यकर्त्यांमध्ये चघळला जाईल.

नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी नवीन नेते म्हणून चुंबळे यांची निवड होईल, हे निश्चित आहे. या अविश्वास ठरावामागे सर्वकाही सूत्रे हलविण्याचे काम चुंबळे यांनीच केले आहे. त्यासाठीची तोशीसही त्यांनीच सहन केली. भाजप नेते, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठबळाने या निमित्ताने त्यांनी अजित पवारांचे सहकारी देविदास पिंगळे यांना धक्का दिला आहे.

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT