Devendra Fadnavis कोल्हापूर दौऱ्यावर... 'साहेब, या दोन मुद्द्यांना आज तडीस लावाच!'

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (6 मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पन्हाळा येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवात ते सहभागी होणार आहेत.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (6 मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पन्हाळा येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवात ते सहभागी होणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते पन्हाळ्यावरील 13D थिएटरचे उद्घाटन होणार आहे. पण फडणवीस यांचा दौरा एवढ्यापुरताच मर्यादित नसून इतर दोन महत्वाच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांचे त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर (Kolhapur) शहराची हद्दवाढ, शक्तीपीठ महामार्ग हे दोन प्रश्न जिल्ह्याच्यादृष्टीने महत्वाचे प्रश्न बनले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र हा महामार्ग होणारच अशी भूमिका राज्य सरकारची आहे. राज्यपालांच्या अभिभाषणातही या महामार्गाचा उल्लेख झाला. या महामार्गासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा पाच पट मोबदला देण्याची तयारी सरकारने केली आहे.

devendra fadnavis
Kolhapur Politics: 'शक्तीपीठ'वरून राजकारण पेटलं; क्षीरसागरांच्या टार्गेटवर सतेज पाटील

मात्र शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) काय झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला होता. तत्पूर्वी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे सुरू आहे. मात्र केवळ प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड करूनच हा प्रश्न सुटणार नाही. याची खात्री जिल्हा प्रशासनाला देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी देखील घेतली आहे. या महामार्गाच्या प्रश्नावर ते काही बोलणार का भाष्य करणार का? हे बघणे महत्वाचे आहे.

devendra fadnavis
Kolhapur Politics : "महायुतीतील नेत्यांची काँग्रेसला अंतर्गत मदत...", शक्तीपीठ महामार्गावरून युतीतील वाद चव्हाट्यावर

दुसरा मुद्दा म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ न झाल्याने शहरवासींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्याने लढा सुरू ठेवून देखील राजकीय इच्छाशक्ती नसल्याने कोल्हापूरची हद्दवाढ रखडली आहे. सध्या शहराची हद्द वाढ व्हावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही सकारात्मक निर्णय होणे शहरवासीयांना अपेक्षित आहे. मात्र महायुतीमधीलच आमदारांचा विरोध पाहता याबाबतची सकारात्मक भूमिका व्यक्त केली जाईल याची शक्यता कमीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com