Gulabrao-Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: महायुतीत भाजप, शिवसनेत विसंवादाचे वारे; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर स्वबळासाठी दबाव?

Shivsena Eknath Shinde politics, Dissensions in Mahayuti, Shivsena preparing self-reliance for zp election-जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपचे वर्चस्व असल्याने शिवसेना शिंदे पक्षात राजकीय अस्वस्थता

Sampat Devgire

Jalgaon Politics: जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जळगावचे राजकारण तापले आहे. बहुतांशी पदांवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे महायुती होणार की नाही, हा चर्चेचा विषय आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद प्रभाग आणि गट-गण रचना आणि आरक्षण पूर्ण होत आली आहे. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यात आघाडी घेतली आहे.https://sarkarnama.esakal.com/maharashtra/uttar-maharashtra/ex-mla-shirish-chaudhari-join-shivsena-eknath-shinde-welcomes-choudhary-in-party-political-shock-to-bjp-sd67

जळगाव महापालिका आणि जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महायुती बाबत घोषणेसाठी दबाव आहे. भाजपचा एक मोठा गट स्वबळाची भाषा करीत आला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सावध झाला आहे. या संदर्भात पाचोरा तालुक्यातून शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी सर्वप्रथम स्वबळाची चर्चा घडवली. आमदार पाटील यांचे बहुतांशी विरोधक भाजप पक्षात गेले आहेत. त्यामुळे पाचोऱ्यात आमदार पाटील विरुद्ध इतर सर्व असे चित्र आहे.

अमळनेर तालुक्यातही अशीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नुकताच भाजपला धक्का दिला. माजी आमदार चौधरी भाजपशी जवळीक असताना शिवसेना शिंदे पक्षात गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने समर्थकांची जिल्हा परिषद निवडणुकीत वर्णी लावणे हा हेतू आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांना बळ देण्यासाठी महायुती आवश्यक आहे. मात्र भाजपचे काही नेते याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील महायुतीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मात्र स्वबळाची चाचपणी करीत आहेत. त्या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक धोका पत्करण्यास तयार नाहीत. या वादातूनच आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा विषय पुढे रेटला जात आहे.

कोणताही वाद न होता जळगाव जिल्ह्यात महायुती एकत्र आल्यास जागा वाटपाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपवर दबाव निर्माण करण्यासाठी स्वबळाची खेळी खेळल्याचेही बोलले जाते. तरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात कसे मनोमिलन होते, यावर जळगावचे राजकारण अवलंबून आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात स्वबळाची तयारी त्यातूनच पुढे आली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT