Eknath Shinde : CM फडणवीस यांचा निकटवर्तीय माजी आमदारच एकनाथ शिंदेंच्या गळाला; जळगावमध्ये भाजपला धक्का!

Maharashtra Political News: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भाजपवर राजकीय मात, माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेना पक्षात दाखल
Eknath shinde, Gulabrao Patil & Shirish Choudary
Eknath shinde, Gulabrao Patil & Shirish ChoudarySarkarnama
Published on
Updated on

Shirish Chaudhari News: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे जळगाव भाजपला शिवसेनेने धक्का दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी मोठा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. जळगाव भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जातो.

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीत युती होणार की नाही, यावर भिन्न मतप्रवाह आहेत. या दृष्टीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला मोठा धक्का दिला.

Eknath shinde, Gulabrao Patil & Shirish Choudary
Nashik Crime : RPI नेते प्रकाश लोंढेच्या गँगला नाशिकमध्ये निर्माण करायची होती संघटीत गुन्हेगारी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

अमळनेर नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय लाभ विचारात घेऊन माजी आमदार चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार चौधरी हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्याने भाजपमध्ये जातील असा कयास होता. मात्र जळगावच्या पारंपरिक राजकारणाला धक्का देत माजी आमदार चौधरी यांनी वेगळ्या निर्णय घेतला.

Eknath shinde, Gulabrao Patil & Shirish Choudary
Narhari Zirwal : दिंडोरीत मंत्री झिरवाळांची प्रतिष्ठा पणाला, गटाची तहान गणावर भागवावी लागणार

माजी आमदार चौधरी यापूर्वीच शिवसेना शिंदे पक्षाच्या संपर्कात होते. त्यांचा प्रवेश देखील निश्चित झाला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे अतिवृष्टीमुळे रद्द झाले. त्यामुळे माजी आमदार चौधरी यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता.

मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार चौधरी यांचा प्रवेश झाला. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रवीण पाठक, माजी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, देविदास महाजन, पंकज चौधरी, गुलाब पाटील, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संधानशिव, साखरलाल महाजन या प्रमुख नेत्यांसह श्री चौधरी यांचा प्रवेश झाला.

समर्थकांच्या राजकीय पुनर्वसनासाठी हा निर्णय झाल्याचे कळते. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत चौधरी यांचे समर्थक इच्छुक आहेत. त्या दृष्टीने पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजपला शह देण्यात यशस्वी झाले.

माजी आमदार चौधरी यांच्या शिवसेना शिंदे पक्षातील प्रवेशामुळे हा भाजपला धक्का मानला जातो. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला शह दिला आहे. त्यांची ही राजकीय खेळी जळगावचे राजकारण बदलण्यात किती यशस्वी होते हे आगामी काळात स्पष्ट होईल.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com