Shivsena followers in police station
Shivsena followers in police station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena news; राऊत प्रकरणात नीलेश राणे विरोधात शिवसेना आक्रमक

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना (Shivsena) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल आक्षेपार्हय वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहर पोलिस (Police) ठाण्यात देण्यात आली आहे. (Shivsena followers submit complain against Nilesh Rane in Jalgaon police)

शिवसेनेतर्फे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली गोलाणी संकुलातील शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक नीलेश राणे यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देत शहर पोलिस ठाण्यात गेले.

पोलिस ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नीलेश राणे यांच्यावर संजय राऊत यांच्याबाबत आक्षेपार्हय वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. गेले काही दिवस नीलेश राणे तसेच त्यांचे कुटुंबीय शिवसेनेच्या नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह विधाने व समाज माध्यमांवर पोष्ट टाकत असतात. त्यांनी आपली पातळी सोडली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विषयी त्यांनी असेच अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, जितू साळुंखे, शेख शाकीर, अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर पठाण, वैद्यकीय आघाडीचे मोहसीन पिंजारी, राहुल पारचा, युवासेना उपजिल्हा प्रमुख विशाल वाणी, समन्वयक महेश ठाकूर, महानगरप्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, ईश्वर राजपूत, महिला आघाडीच्या मनीषा पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT