Gulabrao patil, Raj Thackeray News, Gulabrao Patil on Raj Thackeray, Gulabrao Patil News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चंचल स्वभावाचे राज ठाकरे ऋतूप्रमाणे बदलणारे ; गुलाबराव पाटलांचा टोला

राज ठाकरे यांच्या हातात काहीच लागत नाही म्हणून त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे गुढी पाडव्याला केलेल्या भाषणाचे पडसाद अजून उमटत आहेत. ठाकरे (raj thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. त्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं शिवसेनेचे नेते, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)यांनीही राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Gulabrao Patil on Raj Thackeray)

‘राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात’असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, ''राज ठाकरे यांच्या हातात काहीच लागत नाही म्हणून त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. मोदींवर टीका केली, बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. त्यांचा हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे,''

‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे,'' असा टोला त्यांनी लगावला. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्या बद्दल काय बोलायचं?” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिवसेनेच्या नेत्या, माजी महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, ''राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. आम्हालाही लोकं विचारतात 'लाव रे तो व्हिडिओ,'' शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT