मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( nitin gadkari)यांनी रविवारी राज ठाकरेंची ( raj thackeray) मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर राजकारण तापलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजपची युती होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. (Nitin Gadkari meets Raj Thackeray)
मनसे राज्य सचिव व प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire)यांनी यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलं आहे. खैरे यांनी टि्वट करीत प्रत्युत्तर दिले आहे.
''भाजपाला तुम्ही न मागता दिलेला पाठिंबा चालतो...त्यांच्याशी पहाटेचा शपथविधी चालतो आणि आमच्या नेत्यांनी बरोबर जेवण केलं तरी तुम्हाला मळमळ होते ! आपको ये बात कुछ हजम नही हुई... हाजमोला खाओ खुद जान जाओ,'' असे टि्वट योगेश खैरे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ठाकरे-गडकरी भेटीवर टीका केली आहे.
काल एकत्र जेवण केलं राजसाहेब आणि गडकरी साहेबांनी आणि पोटात मळमळ झाली. यांना..! मनसे आणि भाजपा युतीचा सध्या तरी काही प्रस्ताव नाही.. पण तशी झाली तर ती अभद्र युती आणि ज्या शिवसेनेने खालच्या भाषेत तुमच्या नेत्यांवर टिका केली होती त्यांच्याशी मात्र तुमची पवित्र युती..?
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि भाजप संदर्भात सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे.
ठाकरे-गडकरी यांच्यात जवळपास दोन तास बैठक होते. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असं म्हटलं आहे, तरी या दोन तासांच्या बैठकीत त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भेटीबाबत गडकरी म्हणाले, "ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही"
ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.