Mahavikas Aghadi celebration Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

महाविकास आघाडीच्या जल्लोषाने काँग्रेस भवनाला आली बरकत

Sampat Devgire

नाशिक : कसबा विधानसभा (Pune) पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराच्या विजयामुळे नाशिक (Nashik) शहरात शिवसेनेचा (Shivsena) उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) प्रथमच काँग्रेसच्या दारात उत्सव साजरा करताना दिसला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. (Mahavikas Front came togather for Kasba by election victory celebration)

भारतीय जनता पक्षाचा २८ वर्षापासून बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज काँग्रेसचे उमेदवार विजय झाले. या विजयाने महाविकास आघाडीत उत्साह संचारला.

महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार करता नाशिकमध्ये सर्व पक्ष आज एकत्र आले. महात्मा गांधी रस्त्यावर काँग्रेस भवनासमोर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील पोहोचले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात सहभाग घेतला. आतापर्यंत शिवसेनेने काँग्रेसच्या दारात कधीच प्रवेश केलेला नाही. यापूर्वी शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

शिवसेनेकडे एकेकाळी कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यामुळे शिवसैनिकांनी काँग्रेस भवनवर हल्ला केला. त्या व्यतिरिक्त काँग्रेस व शिवसेनेचा कधी एकमेकांच्या कार्यालयाशी संबंध आला नाही. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. असली तरी हेच चित्र कायम होते.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्ताने हे चित्र आज बदलल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या जल्लोषात महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसह राष्ट्रवादीने देखील सहभाग घेतला. त्यामुळे नाशिक शहरात कोमेजलेल्या काँग्रेस पक्षात विशेष उत्साह पहायला मिळाला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड आकाश छाजेड, वत्सला खैरे, आशा तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, माजी महापौर वसंत गिते, सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन मराठे आदी पदाधिकारी विजयाच्या जल्लोषात सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT