Dr Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuvanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijaykumar Gavit Statement: विजयकुमार गावित पुन्हा बोलले, महायुतीच्या सहकारी पक्षांनी निवडणुकीत फसवले?

Vijaykumar Gavit Speaks Out Were Mahayuti Allies Responsible for Election Betrayal: आगामी निवडणुकीत फक्त भाजपच जिंकेल असे गावित यांनी म्हटले आहे.

Sampat Devgire

Mahayuti Election Rift: नंदुरबार जिल्हा आणि तेथील राजकारण म्हणजे डॉ विजयकुमार गावित असे समीकरण मानले जाते. आता त्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे डॉ गावित आता आपले राजकीय उपद्रव मूल्य सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत.

आगामी काळात नंदुरबार नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या प्रमुख निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित नगरपालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यासाठी ते घरोघर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. भाजप किती सावध झाला आहे, हे यातून स्पष्ट होते.

एवढ्या मायक्रो लेव्हलवर डॉ गावित यांनी यापूर्वी कधीच काम केले नव्हते. आजवर पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा या सर्व सत्ता गावित कुटुंबातच राहिल्या आहेत. त्याला लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा काँग्रेसने सुरुंग लावला. त्याचा बदला नवापूर मतदार संघात माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी करून काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांचा पराभव करून घेतला.

मात्र डॉ. गावित आणि के. सी. पाडवी यांच्यात राजकीय हिशेब चुकता करण्याच्या नादात गावित यांच्या हाती काय लागले हा मोठा प्रश्न आहे. नवापूर मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमश्या पाडवी जिंकले. मात्र ते गावित यांना मदत करण्याऐवजी नुकसानच करण्याची शक्यता आहे.

नवापूर नगरपालिकेवर सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. गेली दोन वर्ष गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र त्यातून गावित विरोधक एकत्र करण्यात आमदार रघुवंशी यशस्वी झाले आहेत. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणून काँग्रेस येथे काय भूमिका बजावते याची उत्सुकता आहे.

त्या दृष्टीने डॉ. गावित यांनी आता भाजप स्वबळावर निवडणुका लढविणार असे जाहीर केले आहे. असे असले तरी डॉ. गावित आता मंत्री नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे नंदुरबारचे पालकमंत्री आहे. त्यामुळे सत्ता महायुतीची असली तरीही सत्तेचा लाभ डॉ. गावित विरोधकांना होण्याचीच शक्यता अधिक आहे. पहिल्यांदा डॉ. गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT