Gulabrao Patil, Chimanrao Patil meets Sharad Pawar : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shinde Group Leaders Meets Sharad Pawar: शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांनी घेतली पवारांची भेट; चर्चांना उधाण

Gulabrao Patil, Chimanrao Patil Meets Sharad Pawar: जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण ..

कैलास शिंदे

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र सोबत प्रवास केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

अमळनेर येथे आज (ता.१६) रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने काल (ता.१५) जळगावला आले.

त्यांच्या सोबत मुंबई येथूनच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील, तसेच शिंदे गटाचे पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील याच गाडीने एकाच डब्यात सोबत आले.

मंत्री गुलाबराव पाटील व शरद पवार यांच्याशी प्रवासात चर्चा करतांनाचे फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाले, तर चिमणराव पाटील व शरद पवार सोबत असल्याचे फोटोही सोशल मीडियावर झळकले त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.

राजकीय चर्चा नाही :गुलाबराव पाटील

जळगाव स्थानकावर पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, इतर विषयावर चर्चा झाली, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला चांगलेच ठरणार आहे.

गुलाबरावांचे मंत्रीपद धोक्यात ?

शिवसेना शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पाच मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. गुलाबराव पाटील यांना वगळण्यात येणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना दुसरीकडे पाटील यांनी पवारांसोबत बराच वेळ चर्चा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT