Jalgaon Municiple corporation
Jalgaon Municiple corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचा आरोप, महापालिका अभियंत्याने घेतले अडीच लाख!

Sampat Devgire

जळगाव : महापालिका (Jalgaon) नगररचना विभागातील अभियंत्याने सहा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर बांधकाम (Construction) मंजुरीसाठी तब्बल अडीच लाख रुपये आपल्याच पुतण्याकडून घेतल्याचा आरोप महापालिकेतील (Municiple corporation) शिवसेना (Shivsena) गटनेते बंटी ऊर्फ अनंत जोशी (Anant Joshi) यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पक्षाच्या (Ruling party) नेत्यानेच हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. (Ruling party Shivsena alligation on Engineer for bribe)

महापालिकेच्या सोळाव्या मजल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बंटी जोशी म्हणाले, की महापालिकेतील नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. याठिकाणी पैसे घेतल्याशिवाय अधिकारी कोणत्याही प्रकरणांना मंजुरी देत नाहीत. एका फ्लॅटच्या मंजुरीसाठी ५० हजार रुपयांचा दर त्यांनी ठरविला आहे. ही रक्कम संबंधित नागरिकांनी दिली, तरच त्यांना परवानगी दिली जाते. बिल्डर लोकही ही रक्कम देत असतील. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

महापालिकेतील नगररचना विभागातील अभियंत्याने आपल्या पुतण्याकडून अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी सांगितले, की आपल्या पुतण्याने मेहरूण भागात सहा हजार स्क्वेअर फुटांच्या जमिनीवर बांधकाम काढले आहे. या बांधकामाच्या मंजुरीसाठी त्यांनी महापालिकेत प्रकरण टाकले होते. त्याला मंजुरीसाठी अक्षरशः नगररचना विभागात अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर त्याने अडीच लाख रुपये एका अभियंत्याला दिले. त्यानंतरही त्यांनी त्याचे काम केले नाही. आपण नगररचना विभागात संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणावर मंजुरीची स्वाक्षरी घेतली. विशेष म्हणजे, या सर्व अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरही या अभियंत्याने मंजूर झालेल्या प्रकरणाची फाइल देण्यासही विलंब केला, अशाप्रकारे नगररचना विभागातील अभियंत्याची मुजोरी वाढली आहे.

अभियंत्यावर कारवाई व्हावी

बांधकाम मंजुरीसाठी अडीच लाख रुपये घेणाऱ्या नगररचना विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अनंत जोशी यांनी केली. याप्रकरणी आपण आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभियंत्यावर कारवाई करणार

नगरसेवक अनंत जोशी यांनी केलेल्या आरोपाबाबत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की आपल्याकडे याबाबत कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. मात्र, नगरसेवकांनी आपल्याकडे लेखी तक्रार दिल्यास आपण त्याची दखल घेऊन चौकशी करणार आहोत. संबंधित अभियंता दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT