Sushma Andhare : राज्यातील मंत्रिपदावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.'अंधारे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार कोसळेल,' असं भाकित अंधारेंनी केलं आहे. (Sushma Andhare latest news)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळाबाबत सुषमा अंधारेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कामाला लागा! २०२३ मध्ये निवडणुका लागणार म्हणजे लागणार” भाजपामुळेच हे सरकार कोसळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचा माईक काढून घेतात, म्हणत अंधारेंनी शिंदेंची खिल्लीदेखील उडवली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "आमच्या एकनाथ भाऊंकडे मंत्रीपद नाही का? आमचे भाऊ तर मुख्यमंत्री आहेत, त्यांचा नाद करायचा नाही. परंतू ते कसे मुख्यमंत्री आहेत? आमच्या भाऊंनी कोणत्याही फाईलवर सही करायची ठरवली, तर ती फाईल देवेंद्र फडणवीसांकडे जाते,”
“ज्या ठिकाणी लोकांचा संताप अंगावर येऊ शकतो, ती खाती एकनाथ शिंदेंकडे आहेत”, असं त्यांनी म्हटलं आहे. “भाजपा आणि टीम देवेंद्रकडून हे ठरवून केलेलं षडयंत्र आणि रणनिती आहे”, असे अंधारे म्हणाले.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित आहेत. यातील मलिद्याची खाती फडणवीसांकडे असल्याचं सांगून अंधारे यांनी टीकास्र सोडलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॉबिनहुड आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीसांकडे सर्व महत्त्वाची खाती आहेत. गृह खातं, वित्त खातं, जलसंधारण खातंही त्यांच्याकडे आहे. जेवढा म्हणून मलिदा असेल, ती सर्व खाती फडणवीसांकडे आहेत. ते सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत,” अशी टीका अंधारे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.