Dr. Anil Bonde & Sanjay Raut
Dr. Anil Bonde & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Bonde News; संजय राऊत यांनी तुरुंगाच्या भिंतीवर डोके आपटून घेतले असावे

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तीन महिने तुरुंगात असल्याने कारागृहाच्या भिंतीवर (Jail) स्वतःचे डोके आपटून घेतले असावे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप भाजप (BJP) राष्ट्रीय किसान मोर्चाचे महामंत्री खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी केला. (Shivsena leader may loose his temper since he was in jail)

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही. त्या वेळी त्यांना शेतकऱ्यांच्या आश्वासनांचे विस्मरण झाले होते. लोक त्यांना गजनी म्हणायचे, आता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी उपरती झाल्याची टीका त्यांनी केली.

भाजपकडून शेतकरी उत्पादक कंपन्या समवेत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला, हे सर्वश्रुत आहे. फडणवीस सरकारच्या काळात पंचस्थळ विकासासाठी निधीदेखील जाहीर करण्यात आला. मात्र, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते बरळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गतिमान पद्धतीने सरकारचे कामकाज सुरू आहे. या सरकारच्या माध्यमातून विशेष करून शेतकऱ्यांना दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन झाले. विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी समृद्धी आणणारा महामार्ग आहे.

विकासकामांमुळे नागरिक आनंदात आहे. परंतु आमच्या नेत्यांकडून अनवधानाने झालेल्या वक्तव्यांचा विपर्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील अपयशाचे खापर शिंदे व फडणवीस सरकारवर फोडण्यासाठी मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT