Rupali Chakankar News; महिलांच्या तक्रार निवारणास प्राधान्य द्या!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयास भेट दिली.
Rupali Chakankar with police officers
Rupali Chakankar with police officersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) पोलिस (Police) ठाण्यांमध्ये तक्रारी घेऊन येणाऱ्या महिला (Womens) अन्यायाने पीडित असतात. त्यांना न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे पोलिस ठाण्यांमध्ये असलेल्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ती आपली भगिनी आहे असे समजून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यास प्राथमिकता द्यावी, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केल्या. (Rupali Chakankar instructed women police officer on Womens issue)

Rupali Chakankar with police officers
ShivSena : महामोर्चाच्या दिवशीच ठाकरेंना धक्का; विदर्भातील नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

आडगाव येथील नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला पोलिस अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

Rupali Chakankar with police officers
Sanjay Raut : 'मेंदू दिल्लीच्या पायाशी ठेवून आले का ?'

यावेळी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती चाकणकर यांनी अधीक्षक कार्यालयात असलेल्या महिला सुरक्षा विभाग, भरोसा सेल यांची पाहणी करून जिल्ह्यातील महिलांसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.

कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनाही त्यांना असलेल्या तक्रारीबाबत विचारणा केली. त्याचप्रमाणे, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, गर्भलिंग निदान चाचण्यासंदर्भात येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेतला. विनयभंग, भादंवि कलम ४९८ अन्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचीही माहिती घेत संबंधित पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आपली महिला म्हणून जबाबदारी असल्याचीही त्यांनी जाणीव करून दिली. जिल्ह्यात सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाकडून कामकाजाबाबत श्रीमती चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले.

‘ज्ञानदीप’मधील घटनेकडे दुर्लक्ष

गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरातील म्हसरुळ हद्दीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना गाजत असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्याबाबत दखलही न घ्यावी, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होते आहे. श्रीमती चाकणकर यांनी किमान याबाबत पोलिस यंत्रणेकडे चौकशी करीत, राज्यभरातील अशा स्वरुपाच्या आश्रमांची महिला आयोगाकडून चौकशी होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे असताना श्रीमती चाकणकर या शनिवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात तीन तास बैठक घेतली. मात्र तिथूनच काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळाकडे फिरकतही नाहीत याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com