Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे शिवसेना आमदारांना नापसंत पडले?

गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळेच शिवसेनेचे आमदार फुटल्याचा दावा केला.

Sampat Devgire

नाशिक : संजय राऊत (Sanjay Raut) बेछूट आरोप करीत होते. केंद्र सरकार, भाजपचे (BJP) नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (R.S.S.) याविषयी त्यांची विधाने म्हणजे उच्छाद होता. तो महाराष्ट्राला आवडला नाही. तसाच शिवसेनेच्या आमदारांना आवडला नाही. त्यामुळे शिवसेनेत बंड झाले, असा दावा भाजप (BJP) नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. (Girish Mahajan criticised Sanjay Raut on his statements)

राज्यातील सध्याच्या घडामोडींबाबत श्री. महाजन बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचे काम केव्हा सुरु झाले हे मलाही सांगता येत नाही. मात्र लोकांमध्ये खुप अनरेस्ट होता. काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांत अस्वस्थता होती. काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे शिवसेनेत आमदारांना कधी पटलेच नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आपली युती कशी? असा प्रश्न ते विचारायचे. बाळासाहेबांनी टोमणे मारले, शिव्या घातल्या, त्या लोकांबरोबरच मांडीला मांडी लावून बसले.

भाजपबरोबर युती केली आणि ५५ आमदार निवडून आले. त्याच भाजपशी घात केला. सर्व वाटाघाटींचा मी सुरवातीपासून सर्व घडामोडींचा साक्षीदार आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर घरोबा करीत आम्ही एकोप्याने राहू अशी शपथ त्यांनी सोनियांची घेतली. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. नंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मला व्हायचे नव्हते. माल अनुभव नाही. मी कधी महापालिकेची पायरीही चढलो नाही, हे सर्व खरं आहे.

एखादी व्यक्ती नगरपालिकेचा सदस्यही नाही, त्याला थेट मुख्यमंत्री केले तर ते चालत नाही. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीत त्यांनी कुठे ढुंकूनही पाहिले नाही. घराच्या बाहेर पडले नाही. कुठल्या जिल्ह्यात गेले नाही. सहकाऱ्यांना भेटले नाही. आमदारांना भेटले नाही. कोणाशी चर्चा केली नाही. आज ते लोक सांगत आहेत की, अडचणीच्या काळात आम्हाला त्यांनी साधं विचारलं देखील नाही. ईडी, सीबीआय अशा अडचणीत आमची चौकशी केली नाही. घरातला कर्ता माणुसच असे करतो तर मग संताप होतो. संतापाचा हा फुगा फुटतो. शिवसेनेच्या आमदारांबाबत तसेच काहीसे झाले आहे.

शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार फुटले. देशाच्या इतिहासात असं कधी घडले नाही. तेव्हाही त्यांनी काहीच केले नाही. जाता हेत तर जाऊ द्या, अशी त्यांची भूमिका होता. त्यात मोठी मदत संजय राऊत यांनी केली. रोज ते बोलायचे. शिव्या घालायचे. भाजप आणि केंद्र सरकारमधीन नेत्यांबाबत काय बोलायचे. संघाबाबत काय विधाने करायचे, हे सर्व लोकांना असह्य झाले. त्याची परीसीमा झाली. हे त्यांच्या आमदारांनाच आवडले नाही. राऊत यांनी जो उच्छाद मांडला. त्याला शरद पवार यांची साथ होती. हे जणू संजय राऊत यांनी शिवसेना संपवायची सुपारीच घेतली होती. त्यानंतर सबंध महाराष्ट्र कंटाळले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT