थोडं थांबा, गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत परत येतील?

आव्हान असले तरी शिवसेना संपणार नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : सध्या वादळ उठले आहे. गोंगाटआहे. शब्द कानावर येत नाहीत. थोड थांबा, वादळ शमले की एकमेकांचे आवाज ऐकू येतील. शिवसेना (Shivsena) सोडून गेलेले काही आमदार (Rebel MLA) पुन्हा पक्षात परत येतील. ज्याच्या रक्तात शिवसेना आहे, ते शिवसेनेला विसरूच शकत नाहीत, असे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. (Chhagan Bhujbal claims, Orignal shivsena worker never live without Shivsena)

Chhagan Bhujbal
हिंमत असेल तर शिवसेना सोडली हे जाहीर करा!

श्री. भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. असे असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Chhagan Bhujbal
आंध्राच्या राजकारणात मोठे वादळ; YSR रेड्डींच्या जयंतीदिवशीच आईने सोडली मुलाची साथ

यावेळी ते म्हणाले, ज्याने वीस, पंचवीस वर्षे शिवसेनेत काम केले आहे, असा कार्यकर्ता शिवसेनेशिवाय राहूच शकत नाही. त्याच्या रक्तात शिवसेना असते. त्यामुळे थोडं थांबा, पक्ष सोडून गेलेले बंडखोर आमदारांतील काही परत आलेले दिसतील. असे यापूर्वी देखील झाले आहे. मंडल आयोगाच्या प्रश्नावरून मतभेद झाल्याने मी अठरा आमदारांसह शिवसेना सोडली होती. तेव्हा नियमानुसार आम्ही एक तृतीयांश होते. यातील सहा आमदार पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले होते, असा दाखला त्यांनी दिला.

ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपलं जोरदार भांडण चाललं होतं. पण एकवेळ अशी आली, की त्यांनी मला माफ केलं. पहिल्यासारखे माझ्यावर प्रेम केलंय. शिवसेनेत अनेक नवीन कार्यकर्ते आणि आमदार आहेत. त्यांना माझ्या शिवसेनेतील आणि त्यानंतरच्या राजकीय प्रवासाविषयी फारशी माहिती नाही. म्हणून याबाबत मी बोलत आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, की शिवसेनेच्या स्थापनेपासून मी होतो. मुंबईतील मोजक्या शाखा प्रमुखांपैकी मी होतो. मुंबईत नगरसेवक, महापौर, आमदार मी शिवसेनेतूनच झालो. अनेक आंदोलनात मार खावा लागला. विधानसभेत बोलताना श्री. शिंदे यांनी त्याचा उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर शिवसेना आणि भाजपमधील पहिल्या समझोत्यावेळी मी होतो. मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षण प्रश्‍नावरून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे मतभेद झाले. आम्ही अठरा आमदारांनी शिवसेना सोडली होती.

ओबीसींचा तिढा सुटावा

बांठिया आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केल्याची माझी माहिती आहे. माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. केंद्र सरकारचे सॉलिटर जनरल तुषार मेहता यांच्याशी ते बोलतो म्हणाले. मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडलेले विधिज्ञ मनविंदर सिंह यांना सोबत घ्या, असे मी त्यांना सांगितले आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आमचे काम केले आहे. आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक काम करावे. देशातील सगळ्या ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटावा, अशी अपेक्षा आहे, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com