नांदगाव : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी मतदारसंघातील विकासनिधीच्या प्रश्नावरून थेट पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी पंगा घेतला होता. तेव्हापासून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध आमदार कांदे असे राजकारण रंगले आहे. त्यात आमदार कांदे यांनी गावोगावी मुक्काचा कार्यक्रम करीत त्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे फक्त हा उपक्रमच नव्हे तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) त्याला काय उत्तर देते याची उत्सुकता आहे.
यासंदर्भात आमदार कांदे (Suhas Kande) यांनी समस्येच्या मुळाशी जाण्याचा भाग म्हणून ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या सहाही गटात तंबू ठोकून आमदार कांदे मुक्कामाला थांबणार असून, त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारीही मुक्कामाला थांबतील. मुक्कामाच्या ठिकाणी झेरॉक्स मशीन ठेवण्यात येणार असल्याने आवश्यक त्या कागदपत्रांसाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. शिवाय समस्यांच्या निराकरणासाठी जागेवर तातडीने कार्यवाही अशा पद्धतीचे नियोजन असल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या अनेक समस्यांचा निपटारा करणे शक्य होणार आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्या अचलपूर मतदारसंघातील अशाप्रकारे राहुटी मुक्कामाचा उपक्रम २००५ पासून बच्चू कडू राबवित असल्याने आमदार कांदे यांनी या उपक्रमासाठी आपल्या कार्यकर्त्यांना अभ्यासासाठी अचलपूरला पाठविले असून, त्यांच्या या निरीक्षण दौऱ्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या सहाही जिल्हा परिषद गटात ‘कर्तव्य यात्रा’ व ‘राहुटी मुक्काम’ या उपक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार कांदे यांनी दिली.
मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन शासकीय कामकाजात सु:सूत्रता येण्यासाठी लवकरच सुरु होणाऱ्या उपक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी असा समन्वय साधला जावा हा त्यातील प्रमुख हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. नांदगाव तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी आमदार कांदे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.