Saroj Ahire & Yogesh Gholap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : `सरोज अहिरेंच्या निर्णयाने, बिन औषधाने दुखणे गेले`

सामान्य मतदार निष्ठेला महत्त्व देतो, इथून पुढे शिवसेनेच्या निष्ठावंतांचेच राजकारण

Sampat Devgire

Yogesh Gholap on MLA Saroj Ahire : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे मी शरद पवार यांची मानसकन्या आहे, असे सांगत असतात. मात्र आज त्यांनी वेगळीच भूमिका घेतली. त्यावर मतदारसंघात तीव्र प्रतिक्रीया उमटले आहेत. (Shivsena leader Gholap criticise MLA Saroj Ahire)

दरम्यान याबाबत शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार अहिरे (Saroj Ahire) यांचा समाचार घेत, `या निर्णयाने औषधाविना देवळालीच्या मतदारांचे दुखणे गेले` अशी सूचक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे, भाजपच्या सरकारला पाठींबा दिला आहे. त्याची संमिश्र प्रतिक्रीया उमटली आहे. देवळाली मतदारसंघातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबत असे स्टेटस ठेवले आहे.

देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. १९९० ते २०१४ पर्यंत येथे बबनराव घोलप आणि २०१४ मध्ये त्यांचे पुत्र योगेश घोलप विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सरोज अहिरे यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. मात्र निवडून आल्यावर लगेचच त्यांच्या कार्यपद्धतीवरून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे देखील तक्रार केली होती.

आमदार अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरजात भाजपच्या सरकारला पाठींबा दलेल्या आमदारांच्या यादीवर त्यांनी सही केली. आज त्या अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याने देवळालीची जागा कोणाला?. यावरून पेच होता. आता माजी आमदार योगेश घोलप यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. `सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघातील नेते, पदाधिकारी व मतदारांना दिलासा दिला आहे. या सगळ्यांचे दुखने त्यांनी बिन औषधाने घालवले. यापुढे फक्त निष्ठावंतांचेच राजकारण असेल. शिवसेनेच्या निष्ठावंतांना मतदार पाठींबा देतील` अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT