Shivsena celebration at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; संभाजीनगर नामांतराचे श्रेय फक्त शिंदे सरकारचेच!

नामांतराला मंजुरीनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आंनदोत्सव साजरा

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) औरंगाबादचे (Aurangabad) ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati SambhajiNagar) तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतरण करण्यास केंद्र सरकारने (Centre) मंजुरी दिली. या नामांतराचे श्रेय केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेच आहे. अन्य कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जनता ते सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (Shivsena) शहरप्रमुख बंटी तिदमे (Bunty Tidme) यांनी दिला. (Shivsena claim all credit of city Name changing decision)

बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे जीपीओ समोरील शिवसेना कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने २० ऑक्टोबर २०२२ औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी यावेळी दिली.

यावेळी, पक्षाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे, महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, पश्चिम विधानसभा संघटक बबलू सूर्यवंशी, शरदचंद्र नामपुरकर, अमित खांदवे उपस्थित होते.

मनसेकडून ‘संभाजीनगर’ पाटी भेट

छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नामांतरास केंद्राच्या मंजुरीचे ‘राजगड’ येथे जल्लोष करण्यात आला. राज्य परिवहन मंडळाच्या बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिटकविण्यात आले. या वेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT