Chhagan Bhujbal News; `भाजप`च्या `त्या` तमाशाने मोदींच्या प्रतिमेला तडा गेला!

देशात लहान पक्षांच्या एकजुटीने २०२४ चे चित्र बदलेल
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) काँग्रेसचे (Congress ) नेते पवन खेरा (Pavan Khera) यांना विमानातून उतरवून अटक करण्याचा जो प्रकार भाजप (BJP) सरकारने केला, त्यातून काय साध्य केले?. असा प्रश्न राज्याची (NCP) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. ते म्हणाले, उलट असा तमाशा करून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. (BJP damage Narendra modi image in Pavan Khera arrest case)

Chhagan Bhujbal
Nashik Congress; निस्तेज नेत्यांत आत्मघातकी गटबाजी पुन्हा सुरु!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि त्यांचे चिन्ह काढून घेण्यात आले असले, तरी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे लोकांना कळते, काय चालले आहे ते. भाजपविरोधात लहान-लहान पक्ष एकत्र येत आहेत. त्यासाठीच ठाकरे आणि केजरीवाल यांची भेट झाली असावी. अशारीतीने अनेक लहान पक्षांची एकजूट होऊन २०२४ चे चित्र बदलेल, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
Pune Bypoll Election : कसब्यात दुहेरी, तर चिंचवडला तिंरगी लढत ; मतदानास सुरवात

राजकीय पातळीवर दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींविषयी माजी मंत्री भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामाकरणाचा ठराव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाने केलाच होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर पूर्वीपासून औरंगाबादचा उल्लेख जाहीर सभांमधून ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा ‘धाराशिव’ असे करायचेच. केंद्राने त्यास मंजुरी दिल्याने एकप्रकारे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली आहे. बाँबेची मुंबई झाली तसेच औरंगाबादचे संभाजीनगर, असा सर्वसामान्यांकडूनही उललेख होऊ लागेल. या नामकरणाला काही पक्ष विरोध करीत असतील, तर आपल्याकडे लोकशाही आहे. त्यांना तो अधिकार आहे. परंतु नामकरण झालेले आहे. त्यामुळे त्यात काही बदल होण्याची आता शक्यता नाही.

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना विमानातून उतरवून अटक करण्याचा जो प्रकार भाजप सरकारने केला, त्यातून काय साध्य केले. उलट असा तमाशा करून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यंत्रणांचा अशाप्रकारे वापर करण्याचा तमाशा पाहून नागरिकांना सारे समजते, असे म्हणत पुण्यातही पोलिसांच्या मदतीने भाजप पैसे वाटप करीत असतील, तर तेही गंभीरच आहे. आत्तापर्यंत सीबीआय, ईडी अशा यंत्रणांचा वापर केला जात होताच, आता पोलिसांचाही वापर होत असेल, तर ते गंभीरच आहे, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com