Sushama Andhare & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : सुषमा अंधारे करणार आज सुहास कांदेंवर हल्लाबोल!

Shivsena Politics, Sushama Andhare`s Mahaprabodhan Yatra In Nashik Today-नाशिकमध्ये आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा.

Sampat Devgire

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. आज एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात मनमाड येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेत अंधारे कांदे यांचा काय समाचार घेतात, हा चर्चेचा विषय आहे. (Shivsena`s Firebrand leader Sushma Andhare is on Nashik tour from Today)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पेटला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील लिलाव बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shivsena) श्रीमती अंधारे यांची महाप्रबोधन सभा होत आहे. शेतकरी भाजप (BJP) सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार कांदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात नांदगाव मतदारसंघात जोरदार राजकीय संघर्ष आहे. आमदार कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजकीय मोट बांधण्यात पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे आमदार कांदे आणि त्यांचे विरोधक यांच्यात चांगलाच राजकीय संघर्ष पेटला आहे. आजच्या अंधारे यांच्या सभेमुळे त्यात काय भऱ पडते याची उत्सुकता आहे.

महाप्रबोधन यात्रा आजपासून जिल्हयात येत आहे. उपनेत्या अंधारे यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागात मनमाड येथे तसेच शहरात सभा होणार आहे. या यात्रा व सभेची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सरकारविरोधात ठाकरे गटाने दंड थोपटले असून शेतकऱ्यांवरील अन्याय, बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यात आलेले अपयश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. दुसऱ्या टप्यातील यात्रेला प्रारंभ होत असून, यात्रेंतर्गत ४० सभांचे नियोजन करण्यात आले आहे. मनमाडमधील एकात्मता चौकात रविवारी जाहीर सभा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT