जळगाव : जिल्ह्यात (Jalgaon) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्ष सोडल्याने भारतीय जनता पक्षात (BJP) फूट पडली आहे. भाजप कमजोर झाला आहे. शिवसेनेचेही (Shivsena) दोन गट पडले आहेत. त्याचा फायदा कॉंग्रेसला (Congress) होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेसचा एक खासदार व पाच आमदार निवडून येतील, असा दावा कॉंग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी केला. (Congress workers shall take benefit of present political situation)
कॉंग्रेस भवनमध्ये पक्षाची आढावा बैठक श्री. देसमुख यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष श्याम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी आमदार ईश्वर जाधव, पाचोऱ्याचे सचिन सोमवंशी, योगेंद्रसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.
या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की जिल्ह्यात मी संघटना बळकट करण्यासाठी आलेलो आहे. आपण तेच काम करणार आहोत. प्रदेशाध्यक्षांनी माझी प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी आपण जिल्ह्यात एक आव्हान घेऊन आलो आहोत. ते आपण पूर्ण करणार आहोत. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपमध्ये फूट पडली आहे.
जळगावमध्ये महाजन व खडसे यांची ताकद विभागली गेली आहे. तर शिवसेनेतही आता फूट पडली आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चित कॉंग्रेसला होणार आहे. आगामी काळात पक्ष बळकटीच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पन्नास टक्के जागा म्हणजे पाच आमदार व एक खासदार कॉंगेसला मिळेल, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजपचे धाबे दणाणले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
जळगावचा आमदार कॉंग्रेसचाच
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की विनायक देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे प्रभारीपद आल्यामुळे जिल्ह्यात आता पक्षाला चांगली उभारी मिळेल, पक्षात नवचैतन्य आले असून, आगामी निवडणुकीत भुसावळ व जळगावचा आमदार कॉंग्रेसचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात गटबाजी नाही
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे सांगितले जात आहे, ते चुकीचे आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. या ठिकाणी उपस्थित असलेले नेते सांगतात गटबाजी नाही, मात्र जे कधीच कॉंग्रेस भवनात येत नाहीत. पक्षाची सदस्य नोंदणी करीत नाहीत. ते लोक बाहेर कुठेतरी नाराज असल्याचे बोलतांना त्याला आपण गटबाजी मानत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कॉंग्रेस मजबूत होत असून. आगामी निवडणकीत निश्चित मोठे यश मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.