Eknath Khadse: मला राजकीय विजनवासातून बाहेर काढणाऱ्या शरद पवारांना सोडेन कसा?

एकनाथ खडसे म्हणाले,सध्या मी माझ्या भाजपप्रवेशाच्या चर्चेचा बिनपैशांचा तमाशा पाहतोय
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : मी राजकीय विजनवासात असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला साथ देऊन बाहेर काढले. त्यांनी आमदारकीसाठी राज्यपाल (Governer Appointed MLC) कोट्यातून नाव दिले. त्या ठिकाणी काम झाले नाही, त्यानंतर मला विधान परिषदेत उमेदवारी देऊन आमदार (MLC) केले. अशा स्थितीत आपण त्यांना सोडून कसे जाणार? माझ्या भाजपप्रवेशाच्या (BJP) चर्चेचा बिनपैशांचा तमाशा आपण पाहताय, मीही पाहतोय अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (NCP leader Eknath Khadse reject rumors of Joining BJP)

Eknath Khadse
Shivsena: मुख्यमंत्री शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आलेले असताना मुक्ताईनगर येथील जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हटले होते, की एकनाथ खडसे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. ते कशासाठी भेटले होते? हे लक्षात घ्या. यानंतर त्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर खडसे भाजपमध्ये पुन्हा परत जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

Eknath Khadse
ShivsenaNews: शिंदे गटात सहभागी होण्यासाठी दबाव आणि बळजबरी?

याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पक्षाचे नेते शरद पवार यांना आपण भेटलो तेव्हा सांगितले, की मला केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घ्यायची आहे. त्या वेळी ते म्हणाले, ठीक आहे, मी त्यांच्या भेटीची वेळ ठरवितो. आपण दोघे मिळून त्यांची भेट घेऊ. स्वतः शरद पवार यांनी आपल्या सोबत भेटीची तयारी दर्शविली होती. याला एक महिना झाला. कामाच्या व्यस्ततेमुळे ते शहा यांची अपॉइंटमेंट घेऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही अद्यापही भेट घेतलेली नाही; परंतु आम्ही भेटीला जाणार आहोत, हे निश्‍चित आहे.

श्री. खडसे पुढे म्हणाले, शरद पवार माझ्या सोबत भेट घेणार आहेत तर ते काय याला भारतीय जनता पक्षात घ्या सांगणार आहेत काय? असा प्रश्‍न करून खडसे म्हणाले, आमदार चंद्रकांत पाटील यांना जळी-स्थळी खडसेच दिसत असल्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा ते पसरवीत असतात. आपण चर्चेचा बिनपैशांचा तमाशा पाहात आहोत. ज्या पवारांनी मला राजकीय विजनवासातून बाहेर काढले त्यांना सोडून आपण कसे जाऊ शकतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या सर्व वावड्या असून, अशा अनेक चर्चा यापुढेही पसरविल्या जातील, हेही ध्यानात घ्या. अशा चर्चांना कुणीही मनावर घेऊ नये.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com