Devyani Pharande, Rahul Dhikale & Seema Hiray
Devyani Pharande, Rahul Dhikale & Seema Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; ठाकरे गट भाजप आमदारांना कोंडीत पकडणार!

Sampat Devgire

नाशिक : शहरात (Nashik) भाजपचे (BJP) तीन आमदार असून या आमदारांसह शिवसेनेच्या शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शासन निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे करताना महापालिका (NMC) ऐवजी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Pwd) कामे केली जातात. यावरून आता राजकारण तापले असुन ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) भाजप आमदारांची कोंडी करण्याती व्युहरचना केली आहे. (Uddhav Thackeray Group take objection on PWD Works of BJP)

महापालिका हद्दीत होणाऱ्या या कामांची गुणवत्ता नसल्याने महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे हस्तांतरित करण्यासाठी ना- हरकत दाखला देऊ नये या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे करत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात दंड थोपटले आहे.

महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्याने आमदारांच्या मार्फत शहरी भागात होणारे कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी महापालिकेचा ना- हरकत दाखला बंधनकारक केला आहे.

महापालिकेने ना- हरकत दाखला देऊ नये. त्याला कारण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गुणवत्तापूर्ण कामे होत नाही. असा आरोप करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने करीत भाजप विरोधात दंड थोपटले आहे.

त्याचबरोबर शासनाकडून विकास कामांसाठी निधी येणार असल्याची चर्चा असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटालादेखील आव्हान देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागात होत असलेली कामे गुणवत्तापूर्ण नाही तसेच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. महापालिकेने ना हरकत दाखला दिल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या

भविष्यात महापालिकेत भरती होणार आहे. यात घंटागाडीचे ८००, सफाई कर्मचारी ७००, पाणीपुरवठा विभागातील ३००, वैद्यकीय विभागातील २८३ अशा जवळपास दोन ते अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आगामी अंदाजपत्रकामध्ये भांडवली जमा रक्कमेमध्ये आस्थापना खर्च वजा करून जी शिल्लक रक्कम राहील त्यामध्ये साठ टक्के रक्कम शहर विकास व आरोग्य वैद्यकीय कामांसाठी प्रस्तावित करावी.

चाळीस टक्के रक्कम स्पील ओव्हरसाठी प्रस्तावित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर , माजी गटनेता विलास शिंदे, विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT