Nashik News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेत्यांचे थेट आव्हान!

काँग्रेसची भवनची पायरीही न चढलेल्या आकाश छाजेड यांना शहराध्यक्ष केल्याची प्रतिक्रीया.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : प्रदिर्घ काळ प्रभारी अध्यक्ष असलेल्या शहर (Nashik) काँग्रेसच्या (congress) अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आकाश छाजेड (Akash Chhajed) यांची नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीने नवा पेच निर्माण केला आहे. गेली अनेक वर्षे या पदावर डोळा असलेल्या नेत्यांनी नियुक्तीला आव्हान देत स्वतंत्र गट निर्माण केला. यानिमित्ताने त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच आव्हान दिले आहे. (Nashik congress leaders unhappy with new appointment of Akash Chhajed)

Nana Patole
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

यासंदर्भात काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी अत्यंत नाराज झाली आहे. यापूर्वी आकाश छाजेड अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठी नाराजी होती. तक्रारी झाल्या. छाजेड यांचे पद गेल्यावर ते पुन्हा कधीही पक्षाच्या कार्यालयात देखील आले नव्हते. अशा व्यक्तीला नियुक्त करणे निष्ठावंत कार्यकर्ते, नेत्यांना मान्य नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

Nana Patole
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

गुरुवारी (ता.2) कसबा पोटनिवडणुकीतील विजयाचा जल्लोष शहर काँग्रेसच्या कार्यालयापुढे साजरा करण्यात आला. त्यात महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे नेते देखील उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मात्र काँग्रेसचा मोठा गट त्यापासून दूर राहीला. यापूर्वी देखील विविध कार्यक्रमांत दोन्ही गटांनी स्वतंत्र कार्यक्रम केले होते. त्यामुळे शहर काँग्रेसमधील गटबाजी चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला असला तरी या जल्लोषातही दोन गट दिसून आले. काँग्रेसच्या नाराज गटाकडून रेड क्रॉस येथील आंबेडकर कॉलनी समोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Nana Patole
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागूल, बबलू खैरे, ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, विजय पाटील, कैलास कडलग, तसेच मागासवर्गीय विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, स्वप्नील पाटील, जितू मारू, जयेश पोकळे, देवेन मारू, रतीश मारू, रमेश मकवाना आदींनी त्यात भाग घेतला.

दुसरीकडे काँग्रेस भवनसमोर ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला. शिवजयंती देखील दोनदा याच गटाकडून साजरी करण्यात आली होती.

अध्यक्षांची नियुक्ती हा गेली अनेक वर्षे वादाचा विषय राहिला आहे. या पक्षाची शहरातील संघटनात्मक स्थिती त्या वादात खंगत गेली. अनेक नगरसेवक पक्षापासून दूर झाले. अनेकांनी उगवत्या सुर्याला नमस्कार म्हणून भाजपचा रस्ता धरला. मात्र या पक्षातील इच्छुकांची मती टाळ्यावर आली नाही. जेव्हढे इच्छुक होते, त्या प्रत्येकाला ते सोडून अन्य सर्वच नावांना विरोध होता. परिणामी जे गंभीर व पक्षासाठी काही करण्याची तळमळ असलेली मंडळी देखील अलिप्त झाली. त्या वादात नियुक्ती रखडली होती.

Nana Patole
Abdul Sattar News: विमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना भरपाईचा विचार!

नियुक्त्या रखडण्यात पक्षाचे संपर्क नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका देखील होती. त्यांच्या मतदारसंघ शेजारीच आहे. त्यामुळे अनेक मंडळी त्यांच्या संपर्कात आहे. त्यातून नाराजी नको म्हणून त्यांनी नियुक्ती स्थगीत ठेवली होती. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादात पटोले यांनी संधीचा लाभ घेत छाजेड यांची नियुक्ती केली. सध्या थोरात यांनी जमवून घेतल्याचे चित्र आहे, मात्र स्थानिक नेते पुन्हा गटबाजीत रमल्याने ही स्थिती आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गंभीर धोक्याचा इशारा मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com