Uddhav-Thackeray.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT Politics: जळगावच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी गटबाजी वरून खडसावले!

Shivsena UBT;Thackeray party leaders in Jalgaon district clash among themselves-जळगाव जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईला शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक.

Sampat Devgire

Jalgaon Shivsena News: महाविकास आघाडीत एकोपा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणुकीची तयारी करीत आहे. त्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

जळगाव महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष करीत आहे. या संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघटनात्मक स्तरावर फेरबदल करण्यात आले आहेत. हे बदल आता वादाचा विषय ठरला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबईत झाली. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही बैठक होती. सर्व प्रमुख पदाधिकारी हजर होते. मात्र निवडणुकीच्या चर्चा ऐवजी नव्या नियुक्त्यांवरून पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा फटका बसला. त्यानंतर घडलेल्या विविध घडामोडींमुळे पक्षात सध्या मरगळ आहे. त्यामुळे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या विरोधात जुन्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. या तक्रारींमुळे पक्षात विसंवादाचे वारे वाहू लागले आहे.

कुलभूषण पाटील यांची नुकतीच जळगाव जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीच आता वादाचा विषय ठरला आहे. कुलभूषण पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती. अशा बंडखोरी करणाऱ्या कडे पक्षाचे नेतृत्व देण्यास पदाधिकाऱ्यांनी विरोध केला.

संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार यांसह विविध पदाधिकारी मुंबईच्या बैठकीत उपस्थित होते. अष्टपदाधिकाऱ्यांनीच संघटनात्मक तयारी बाबत चर्चा करण्याऐवजी आपसात वाद केले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले. उद्धव ठाकरे यांनी या सर्वच पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी तातडीने सुरू करावी. पदाधिकाऱ्यांमध्ये चांगल्या समन्वय निर्माण करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. आपापसात वाद करण्याऐवजी समन्वय वाढ व्हावा, असे ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना सुनावले.

जळगाव जिल्ह्यात महायुती संघटनात्मक दृष्ट्या आणि सत्तेच्या माध्यमातून प्रबळ आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील विविध पक्षातील आणि विशेषतः शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीत सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाला स्थानिक पातळीवर अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यातूनच ही गटबाजी शिगेला पोहोचल्याचे बोलले जाते.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT