uddhav thackeray | eknath shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde : 'लाडकी बहिण' योजनेचे 1500 रुपये परत घ्या, मात्र गद्दारीचा शिक्का नको; ठाकरे गटानं शिंदे सरकारला डिवचलं

Shivsena UBT On Ladki Bahin Scheme : 'लाडकी बहीण' योजना शिंदे सरकारनं जाहीर केली. त्यात प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. याची खिल्ली ठाकरे गटानं उडवली आहे.

Sampat Devgire

Shivsena UBT News : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना घोषित केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाने त्याला भन्नाट उत्तर दिले आहे.

'लाडकी बहीण' योजना शिंदे सरकारनं जाहीर केली. त्यात प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यासाठीच्या अटी आणि बंधने पाहता सरकारच्या हेतूवरच संशय येतो, अशी खिल्ली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उडवली आहे.

यासंदर्भात शिवसेना ( Shivsena ) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगसेविका आणि त्यांचे पती बाळा दराडे नगरसेविका किरण गामने दराडे यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. याचं पोस्टरही सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. "ही योजना राबविणारे सरकार गद्दारांचे सरकार आहे. त्यामुळे अशा गद्दारांकडून मदत घेतल्यास नागरिकांवर देखील गद्दारीचा शिक्का उमटू शकतो. हा अवमान प्रामाणिक जनता कसा सहन करेल?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.

दराडे दाम्पत्यानं 'लाडकी बहीण' आणि वर्षाला 'तीन गॅस सिलेंडर'ची योजना आम्हाला नको, असं म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सिडको भागात महिलांकडून अर्ज भरून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. किमान दहा हजार महिला या भागातून 'दीड हजार रुपये परत घ्या, मात्र गद्दारीचा शिक्का नको,' अशा आशयाचा संदेश शिंदे सरकारला पाठवणार आहे.

ladki bahin yojna

दरांडेच्या उपक्रमाची दखल राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) नेते, जितेंद्र आव्हाड यांनी देखील घेतली आहे. त्यांनी हे पोस्टर 'एक्स' अकाउंटवर टाकलं आहे. आता नाशिक शहरातही शिवसेना ठाकरे गटाच्या या आगळ्यावेगळ्या विरोधाची चर्चा होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची योजना त्यांनाच अडचणीची होती की काय? अशी स्थिती आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT