Uddhav-Thackrey-Devendra-Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर केली महायुतीची राजकीय कोंडी?

Shivsena Uddhav Thackrey aggressive on loan waiver, economic calculations of Mahayuti will collapse, political deadlock on loan waiver issue-अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असल्याने शिवसेनेने रस्त्यावर उतरत शेतकरी कर्जमुक्तीचा विषय तापवला

Sampat Devgire

Shivsena UBT News: राज्यातील महायुती सरकार विविध कारणांनी आर्थिक अडचणीत सापडले आहे. विरोधकांनी या संधीचा राजकीय लाभ उठविला आहे. आता यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील उडी घेतली.

राज्यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजचे नेमके निकष काय यावरून गोंधळाची स्थिती आहे.

आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बुधवारी राज्यभर निदर्शने करीत राज्य शासनाची कोंडी केली. शिवसेनेने शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न लावून धरला आहे. कर्जमुक्ती केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, भूमिका उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बुधवारी राज्यभर निदर्शने करीत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप या निमित्ताने करण्यात आला. त्यामुळे राज्य शासन अतिवृष्टीच्या प्रश्नावर कोंडीत सापडण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कर्जमुक्तीच्या प्रश्नावर नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी राज्यभर मोर्चे काढत सरकारला इशारा दिला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि बच्चू कडू अशा सगळ्यांनीच कर्जमुक्तीच्या प्रश्नावर सरकारची दुखरी नस दाबली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी योग्य वेळी कर्जमुक्ती केली जाईल अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे.

राज्य शासनावर कर्जाचा बोजा वाढतो आहे. त्यातच शासनाने काही मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे सुमारे ८० हजार कोटींची बिले थकीत आहेत. या स्थितीत कर्जमुक्तीचा प्रश्न विरोधकांनी लावून धरला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रश्नावर कर्जमुक्तीचा प्रश्न महायुती सरकारची कोंडी करीत आहे.

----------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT