Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray Breaking : भाजपचा 2014 चा 'तो' गेम प्लॅन उद्धव ठाकरेंनी केला उघड

Nashik Melava : 2014 मध्ये शिवसेना फोडण्याचे होते मोठे कारस्थान.

Sampat Devgire

Shivsena Vs BJP News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिक मध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये ठाकरे यांनी भाजपचे राजकारण आणि त्यांनी शिवसेना विरुद्ध केलेली कारस्थाने सविस्तरपणे मांडली. यावेळी त्यांनी 2014 मध्ये भाजपच्या नेत्यांनी सांगितलेले धक्कादायक सत्य देखील उपस्थितांपुढे मांडले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 2012 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागले. यावेळी पक्षांतर्गत आणि विरोधक अशा दोन्ही स्तरावर विविध आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यात सर्वाधिक धक्कादायक वर्तन सहकारी पक्ष भाजपने केले होते. भाजपने शिवसेनेकडे अवास्तव जागांची मागणी करित युती तोडली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबतचा धक्कादायक खुलासा उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर सभेत केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून ६३ जागा मिळवल्या. या निकालानंतर भाजपचे एक वरिष्ठ नेते ठाकरे यांच्या अभिनंदन करण्यासाठी मातोश्री वर आले होते. यावेळी या नेत्यांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे प्लॅन उघड केल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

या नेत्यांनी भाजपला शिवसेना संपवायची होती. दिल्लीतील नेत्यांनी 'बालासाहेब ठाकरे तो नही रहे. उद्धव अकेला क्या करेगा?. शिवसेना कार्यकर्ता उनके साथ थोडी जायेंगे?. वो तो बीजेपी को वोट करेंगे. इसलिये शिवसेना के साथ अलायन्स मत करो. शिवसेना खतम हो जाएगी' असा भाजपचा डाव होता, त्याची माहिती खुद्द भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाकरे म्हणाले, 'भाजपने एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून आणि खोक्याचे राजकारण केले. शिवसेना फोडली. त्यांना वाटत होते, शिवसेना संपली. मात्र, शिवसेना संपणार नाही खरे तर भाजपला 2014 मध्येच शिवसेना संपवायची होती. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. आताही शक्य होणार नाही. कारण शिवसेना कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपने शिवसेनेविषयी केलेल्या कारस्थानांचे गुपित कालच्या सभेत उघड केले. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.

SCROLL FOR NEXT