Sudhakar Badgujar

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे महापालिकेवर एकहाती सत्तेचे शिवधनुष्य पेलणारच!

शिवसेनेच्या नाशिक पॅटर्नची राज्यभर चर्चा असल्याचा बडगुजर यांचा दावा

Sampat Devgire

नाशिक : शहरात शिवसेनेचा (Shivsena) वेगाने विस्तार करण्याचे आव्हान होते. आत्तापर्यंतच्य महानगरप्रमुखांनी आपल्या परीने पक्षवाढीसाठी मेहनत घेतली आहे. मी विस्तारासोबतच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सेनेचा विचार घराघरापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा आहे. शिवसैनिकांचे मनोबल हे उंचावले, असा दावा नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केला.

ते म्हणाले, शिवसैनिक आणि महानगरप्रमुख अशी विभागणी मला मंजूर नाही. महानगरप्रमुख ही पक्षाने सोपविलेली एक जबाबदारी आहे. मात्र मीदेखील एक शिवसैनिकच आहे. शिवसैनिकांशी जोडणारा एक धागा बनून शिवसैनिकांच्या सामूहिक शक्तीने महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. गेले तीन टर्म जनतेने माझ्यावर विश्वास टाकून महापालिका सभागृहात पाठविले आहे. त्यामुळे जनतेला न्याय देण्याचा माझा प्रयत्न होता, आणि यापुढेही राहील.

नगरसेवक बडगुजर म्हणाले, शिवसेना यापूर्वी १९९७ ते ९९ पुढे २००२ ते २०१२ या कालखंडात महापालिकेत भाजपसह सत्तेत होती. त्यानंतर शिवसेना सत्तेत नाही. मधल्या काळात महापालिकेच्या विकासकामांचा झालेला खेळखंडोबा जनतेसमोर आहे. मूलभूत समस्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

त्यामुळे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याचे शिवधनुष्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उचलण्यास सांगितले आहे. पक्षप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमेतेने मैदानात उतरलो आहोत. मतदार याद्यांमधील दुबार नावांचा घोळ शिवसैनिकांनी परिश्रम करुन शोधून काढला. प्रशासनानेदेखील या गंभीर बाबीची दखल घेऊन ही नावे कमी केली. या गोष्टीचा अनैतिक फायदा हा गेल्या निवडणुकीत भाजपला झाला आहे, हे विसरुन चालणार नाही.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT