Sanjay Raut News, Nashik Latest Marathi News, Shivsena news
Sanjay Raut News, Nashik Latest Marathi News, Shivsena news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गैरहजर राहणाऱ्यांवर नजर ठेवणार शिवसेनेची स्वतंत्र टिम

Sampat Devgire

नाशिक : आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात (Maharashtra) सत्तांतर घडून आल्याने शिवसेनेसाठी (Shivsena) हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून, आगामी महापालिकांच्या (NMC) निवडणुकीतून बंडखोरी मोडून काढण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. (Shivsena leader Sanjay Raut on Nashik tour from yesterday)

खासदार राऊत यांच्या दौऱ्यातील हे दोन दिवस महत्त्वाचे असून, घडामोडींकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. एकप्रकारे सेनेची परिक्षाच या दौऱ्यानिमित्त होणार आहे.(Shivsena Latest Marathi news)

या मेळाव्यासाठी माजी नगरसेवकांना निमंत्रणे देण्यात आली असून, मेळाव्याला कोण हजर राहतो यापेक्षा गैरहजर कोण राहणार, याकडे अधिक लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शहरी भागात बंडखोरीला थारा मिळत नसल्याचे चित्र असून, जवळपास सर्वच पदाधिकारी, माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.(Nashik Latest Marathi News)

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथून लावताना शिवसेनेत मोठे बंड घडून आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३९ आमदार गेले. त्यामुळे शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात हे सर्वात मोठे बंड मानले जात आहे. या बंडामुळे शिवसेना पूर्णपणे हादरून गेली आहे. बालेकिल्ल्यांना हादरे बसत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरत आहे. शिवसेनेत घडलेले बंड ज्यांच्याभोवती केंद्रित झाले ते पक्ष प्रवक्ते व खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे.

दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी त्यांनी वेळ दिला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा एक मेळावादेखील आयोजित करण्यात आला असून, या वेळी शक्तीप्रदर्शन होणार आहे. शक्तीप्रदर्शन करताना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोण याची, चाचपणी होणार असून गैरहजर राहणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र टिम कार्यरत ठेवण्यात आली आहे. कोण येतो यापेक्षा कोण गैरहजर राहतो, यावर विशेष लक्ष राहणार आहे. विशेष करून शहरात माजी नगरसेवकांवर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणे देण्यात आल्याचे समजते.

माजी नगरसेवकांवर भिस्त

शिवसेनेच्या ३५ माजी नगरसेवकांवर शहराची भिस्त राहणार आहे. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संजय राऊत यांचा कायम संपर्क होता. नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे व सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असले तरी शहरी भागात त्यांचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे माजी नगरसेवक सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच असल्याचे तूर्त दिसत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT