Shivsena Women official Clash Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Women officials Clash : शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी भिडल्या; पोलिसांसमोरच झटापट, शिविगाळ अन्...

Nashik News : वाद मिटवण्याचा वरिष्ठांचा प्रयत्न पण तक्रार दाखल

सरकारनामा ब्यूरो

Shivsena Women officials Clash in Nashik : नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंद गटातील महिला पदाधिकारी एकमेकींना भिडल्याची घटना घडली आहे. या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातच शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती आहे. यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला. तेथेही या महिला पदाधिकाऱ्यांत झटापट झाली.

शिवसेनेच्या महानगरप्रमुख लक्ष्मी ताठे आणी ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या शोभा मगर यांच्यामध्ये हा राडा झाला. ताठे यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप मगर यांनी केला. या वादाबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे (Shivsena) राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांडक सर्कल येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यावेळी महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पद वाटप करण्यावरून शाब्दिक चकमक झाली. शोभा मगर यांनी लक्ष्मी ताठे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. (Nashik News)

या प्रकारानंतर लक्ष्मी ताठे या मुंबई नाका पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. तेथे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र शोभा मगर आणि त्यांचा मुलगा धीरज मगर यांनी पोलीस ठाण्यातच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच धीरज मगर यांनी विनयभंग केल्याचाही आरोप ताठे यांनी केला आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ताठे यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी शोभा मगर यांनी आपल्याला तक्रारीबाबत कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले. तसेच ही घटना पक्षनेत्यांसमोर घडली आहे. त्यामुळे मी काय बोलले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे स्पष्टीकरणही शोभा मगर यांनी दिले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यावसण हाणामारीत झाले. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT