Akola News : मंत्र्यांची पाठ फिरताच मोहीम गुंडाळली; तपासणीवर संशयाचे ढग, चौकशीत सहभागी लोकांवर प्रकरण उलटणार?

inquiry : चौकशीत काय आढळले याचे उत्तर कुठलाही अधिकारी द्यायला तयार नाही.
Akola
AkolaSarkarnama
Published on
Updated on

Some will camp in Akola for the last three days : खरीप हंगामाच्या तोंडावर अकोल्यातील कृषी निविष्ठाधारकांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी राबवलेली धडक मोहीम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही मोहीम शुक्रवारी (ता. नऊ) सायंकाळी आटोपती घेण्यात आली असून अधिकारी गावी परतले आहेत. (The Campaign has come under suspicion)

मोहीम हाताळण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या नजीकचे काही जण गेले तीन दिवस अकोल्यात तळ ठोकून असल्याची खमंग चर्चा यानिमित्ताने कृषी वर्तुळात जोरात सुरू आहे. एक स्वीय सहायक, तसेच कृषी क्षेत्रातील एक जाणकार खासगी व्यक्ती या मोहिमेची सूत्रे हाताळत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे एकूणच ही मोहीम नेमक्या कुठल्या उद्देशाने आखली गेली, या चौकशीत काय आढळले याचे उत्तर कुठलाही अधिकारी द्यायला तयार नाही.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज (ता. १०) अकोल्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. पण तपासणी करणारी टीम तीन दिवसांपूर्वीच आली होती. आज कृषीमंत्र्यांची पाठ फिरताच टीममधील अधिकाऱ्यांसह सर्व जण आपआपल्या गावी परतले. या प्रकरणाची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.

अशा प्रकारच्या तपासणी फंड्याविरुद्ध विरोधी पक्षाच्या आमदारांनी थेट कृषिमंत्र्यांनाच (Minister) टारगेट केले आहे. अकोल्यात सात ते नऊ जून या काळात कृषी निविष्ठांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात आली. यासाठी राज्यभरातून ४० ते ४५ अधिकारी १४ टीममध्ये विभागले होते. या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्याविषयी बंधने घालण्यात आली होती.

राज्य तसेच देशात काम करणाऱ्या सुमारे २०० पेक्षा अधिक कंपन्यांची गोदामे अकोल्यात आहेत. या खरीप हंगामासाठी सर्व कंपन्यांनी त्यांचा साठा गोदामांत करून ठेवलेला आहे. ही संधी साधत तपासणीची मोहीम राबवण्यात आली. जाणीवपूर्वक वरिष्ठांच्या निर्देशात कृषी आयुक्तालयाच्या सूचनेवरून ही मोहीम आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने खाजगी व्यक्ती यात ढवळाढवळ करीत होते, ते पाहता ही चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

Akola
Akola Police Transfers News: अकोला जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या; अनेकांना लॉटरी, तर काहींना अद्यापही प्रतीक्षा…

कृषी खात्याची यंत्रणा ऐन हंगामाच्या तोंडावर अशा प्रकारे विशिष्ट हेतूने राबवण्यामागील अर्थ काय हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात गोदामांच्या तपासणीची मोहीम राज्यभर राबवली गेली. अकोल्यातही तपासणी झाली होती. त्यानंतर पुन्हा खास करून अकोल्यासाठी (Akola) विशेष मोहीम आखण्याची गरज कुठल्या कारणाने पडली. याबाबत चौकशीतील एकानेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तर दुसरीकडे ज्या गोदामांची तपासणी करीत सील केले, त्या कारवाईविरुद्ध गोदाम मालकांनी कृषी विभागाला निवेदन आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता ही तपासणी केली गेली. शिवाय जेथे अनियमितता दिसून आली, त्यांना ती सुधारण्याची संधी मिळायला हवी होती, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर एका गोदाम संचालकांनी थेट एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात त्या खाजगी व्यक्तीविरुद्ध तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या कारवाईसाठी सर्वजण एकवटले आहेत. एकूणच हे प्रकरण चौकशीत सहभागी झालेल्यांवर उलटणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com