Ravindra Pawar & Sindhutai Kokate
Ravindra Pawar & Sindhutai Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar APMC News: राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटेंचा `करेक्ट` कार्यक्रम केला!

Sampat Devgire

Sinnar APMC News: सिन्नर बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का देत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली. समसमान जागा मिळालेल्या या समितीत वाजे गटाने कोकाटेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याने तालुक्याच्या राजकारणाला धक्कादायक वळण मिळाले. (NCP MLA Manikrao kokate defeated by Rajabhau Waje in Sinnar APMC chairmen election)

सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या (APMC) सभापती, उपसभापती पदाची निवडणूक आज झाली. त्यात शिवसेनेचे (Shivsena) राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) गटाचे डॉ. रवींद्र पवार यांची सभापतीपदी तर कोकाटे गट सोडून वाजे गटात आलेल्या सिंधुताई कोकाटे यांची उपसभापतीपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) गटाला पराभवाचा धक्का बसला.

सिन्नर बाजार समितीच्या सभागृहात आज सकाळी बाराला इगतपुरीच्या सहाय्यक सहकार उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालकांची पळवापळवी होण्याच्या शक्यतेने केंद्रीय राखीव पोलिस व स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता होती.

बाजार समितीच्या या निवडणुकीत सोसायटी गटात वर्चस्व ठेवत कोकाटे गटाने आठ तर वाजे गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. ग्रामपंचायत गटात सर्व चार जागा जिंकत वाजे आघाडीवर होता. व्यापारी गटाच्या दोन्ही जागा वाजे तर हमाल, मापारी गटात कोकाटे यांचा उमेदवार विजयी झाला होता. दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्याने राजकारण तापले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकाटे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे विजयी संचालक असे, शशिकांत गाडे, भाऊसाहेब खाडे, अनिल शेळके, रविंद्र शिंदे, विनायक घुमरे, नवनाथ नेहे, संजय खैरनार, सुरेखा पांगारकर, सिंधुबाई कोकाटे तर राजाभाऊ वाजे, उदय सांगळे गटाच्या जनसेवा पॅनलचे उमेदवार असे, शरद थोरात, जालिंदर थोरात, नवनाथ घुगे, डॉ. रवींद्र पवार, श्रीकृष्ण घुमरे, गणेश घोलप, प्रकाश तुपे, सुनील चकोर, रवींद्र शेळके. यामध्ये श्रीमती कोकाटे यांनी कोकाटे गटाला सोडून वाजे गटाला मदत केल्याने कोकाटे यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT