Jalgaon Crime News : आला...रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला

Action Against Sand Mafia In Jalgaon: वाळू माफिया विठ्ठल पाटील याला ‘शुट आऊट ॲट वडाला’चा स्टंट चागंलाच महाग पडला.
Sand Mafia Vitthal Patil
Sand Mafia Vitthal PatilSarkarnama

Jalgaon News: वाळू माफीयाने आपली दहशत दाखविण्यासाठी केलेला स्टंट त्याच्या चांगलाच अंगलट आला. याबाबत त्याला शहरात जीपच्या बोनटवर बसवून फिरवत माफी मागायला लावले. त्यामुळे शहरातील आकाशवाणी चौकात मध्यरात्रीच्या सुमारास वाळू वाहतुकदार संघटनेचा अध्यक्ष विठ्ठल पाटील याने जिपच्या बोनटवर बसुन केलेला स्टंट म्हणजे पोलिस दलाच्या कर्तबगारीचा नमुनाच मानला जात आहे. (Police take serious action against Jalgaon sand mafia Vitthal Patil)

जळगाव (Jalgaon) जिपच्या बोनटवर बसुन ‘आला रे आला, मन्या आला’, या गाण्यावरील त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने रान उठवले. त्यानंतर चोविस तासांनी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याच्या स्टंटसह माफिनाम्याचा नवा व्हिडीओ बुधवारी रात्री पोलिसांनी व्हायरल केला.

Sand Mafia Vitthal Patil
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजप आव्हानं कशी पेलणार ?

‘शुट आऊट ॲट वडाला’ या २०१३मध्ये झळकलेल्या चित्रपटातील दृष्याप्रमाणेच पाटील याने स्टंट केल्याची ही घटना मंगळवार (ता. १६) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. राष्ट्रीय महामार्ग भेदुन जाणाऱ्या आकाशवाणी चौकात बोलेरो जिपवर (एमएच१९, बीजे ५९५१) बसून पाटील व त्याचे साथीदार अक्षय सपकाळे (वय ३४, रा. खेडी), गौतम यशवंत पानपाटील (वय ३८, रा. सावखेडा) आणि देवेंद्र सोपान सपकाळे (वय २५, रा. आव्हाणे) या चौघांनी मन्या सुर्वे स्टाईल स्टंट करत गर्रर्रकन चौकाला राऊंड मारले.

या स्टंटचा व्हिडीओ देवा सपकाळे याने मोबाईलमध्ये शुट करून सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार चोविस तासांनतर स्टंट करणाऱ्या पाटीलला रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर पोलिस नाईक राजेश शिवसींग चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर त्याच्या माफिनाम्यासह पोलिसांनी दुसरा व्हिडीओ व्हायरल केला.

Sand Mafia Vitthal Patil
Kiren Rijiju News : मोठी बातमी! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्री पदावरुन हटवलं...

विठ्ठल पाटीलच्या पोलिस मित्रांनी यापूर्वी वाहतुक निरीक्षकाच्या दालनात जंगी बर्थ-डे सेलिब्रेशन केले होते. या प्रकरणात दोन पोलिस नंतर निलंबीत झाले. तसेच, कोरोना काळात वाहतूक निरीक्षक कुनगर यांनी वाळू डंपर पकडल्यावर याच विठ्ठलभाईच्या पुढाकाराने वाळूमाफिया या संज्ञेत मोडणाऱ्या समस्त वाळू वाहतुकदारांनी हाच आकाशवाणी चौक जाम करुन आंदोलन करण्याची हिम्मत दाखवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com