ShivSenaUBT Rajendra Pathare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AB form controversy ShivSenaUBT : ठाकरेंची 'मशाल' पेटवणारच! 'एबी' फाॅर्म चोरीचा आरोप अन् हकालपट्टी, तरी शिवसैनिकांनी ठोकला शड्डू!

ShivSenaUBT Rajendra Pathare Asserts Mashal Symbol Will Remain Despite AB Form Theft Allegation on Anil Desai : राहाता नगरपालिकेत एबी फाॅर्म चोरीचा आरोप झालेले शिवसैनिक मशाल चिन्हं घेऊन निवडणूक लढवत आहेत.

Pradeep Pendhare

ShivSenaUBT Anil Desai AB form theft : 'एबी' फाॅर्म चोरीच्या आरोपानंतर, हकालपट्टी झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राहाता इथले शिवसैनिकांनी निवडणुकीचे मैदान सोडलेले नाही. आम्ही 'मशाल' चिन्हं घेऊनच, नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहोत.

''एबी' फाॅर्म चोरीच्या मुद्यावर निवडणुकीच्या निकालानंतर, तीन डिसेंबरनंतर बोलले, असा सूचक इशारा देताना, राहाता इथले शिवसेना बाळासाहेब थोरात चालवत असल्याचा घणाघात,' माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केला.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी, पक्षाचे 'एबी' फाॅर्म चोरीचा गेले होते. याच फाॅर्मच्या आधारे राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांना कळवून देखील संबंधितांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, असा गंभीर आरोप केला. यानंतर चोरीचे 'एबी' फाॅर्म भरणाऱ्या उमेदवार शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Election) दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. राहाता इथल्या नगरपरिषदेतून नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्ज राजेंद्र पठारे यांनी मागे घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि अपक्ष, असे दोन्ही नगराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेतल्याचे राजेंद्र पठारे यांनी सांगितले.

राजेंद्र पठारे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "खासदार अनिल देसाई यांनी पक्षाचे एबी फॉर्म चोरीच्या केलेल्या आरोपावर मी तीन तारखेला निकालानंतर बोलेल. अनिल देसाई यांनी केलेले एबी फॉर्म चोरीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. उमेदवारी कारवाईच्या भीतीने मागे घेतलेली नाही, पक्षातून हकालपट्टी झालेली आहे आणखी कोणती मोठी कारवाई व्हायची बाकी राहिली आहे. कारवाईला नाही, दबावला नाही आणि कोणत्याही एक रुपयाच्या आमिषला बळी पडून उमेदवारी मागं घेतलेली नाही."

ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला, तरी प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरसेवक पदासाठी, माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्यावतीने उमेदवारी आहे, ती माघारी घेतलेली नाही. तसंच सागर लुटे हे प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि उज्वला होले प्रभाग क्रमांक आठमध्ये 'मशाल' चिन्हावर उमेदवारी करत आहेत, असे सांगून आम्हाला ठाकरेंची मशाल पेटती ठेवायची असल्याचे राजेंद्र पठारे यांनी सांगितले.

'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवणार

'पक्षचिन्हांबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा झालेली आहे. पण ती काय चर्चा झाली हे मी तीन तारखेला निकालानंतर सांगेन. पक्षाने कारवाई केली तरी आम्ही फकीराच आहोत. पक्षाने आमची हकालपट्टी करण्यापूर्वी फॉर्म भरला आहे. त्यामुळे हकालपट्टीच्या कारवाईचा आमच्या उमेदवारीवर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला अपक्ष चिन्ह नको होते, आम्हाला 'मशाल' चिन्ह हवे होते. यातून हा वाद निर्माण झालेला आहे,' असेही राजेंद्र पठारे यांनी सांगितले.

मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी 'एबी' फाॅर्म दिले

राहता इथली शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही, इथली शिवसेना ही बाळासाहेब थोरात चालवतात आणि मी त्या मतावर अजूनही ठाम आहे. आमच्या पक्षांमध्ये पदाधिकारी हे 'एबी' फॉर्म आणून देतात. मुंबईतून लोक 'एबी' फाॅर्म घेऊन येत असतात.एबी फॉर्म बाबत वेगवेगळ्या भूमिका आहेत. मला जे 'एबी' फॉर्म दिलेले आहेत, ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात काही मुंबईचे लोक होते. याबाबत मी खुलासा करेल तो निकालानंतर, असा पुनरूच्चार राजेंद्र पठारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT