ShivSenaUBT Kiran Kale Sarkanama
उत्तर महाराष्ट्र

Mayor post price : मतं विकत घेण्यासाठी अब्ज, महापौरपदासाठी भाव पाच कोटी! ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्यानं राजकारणात भूकंप

BJP–Ajit Pawar NCP Alliance Accused of Vote Buying in Ahilyanagar Civic Polls : अहिल्यानगरच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक, आगामी काळ हा अत्यंत भ्रष्ट सत्ता काळ असणार असल्याचा घणाघात शिवसेनायुबीटीचे किरण काळे यांनी केला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation election : "अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मत खरेदी केली गेली. प्रत्येक मतासाठी सरासरी दोन ते दहा हजार रुपयापर्यंतचा रेट सत्तेतल्या तीनही भ्रष्ट पक्षांनी दिला.

50 खोक्यांच्या घोडे बाजारातून स्थापन झालेल्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांकडून तब्बल एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्कमेला मतं खरेदी करून अहिल्यानगर मनपाची सत्ता काबीज केली. आता महापौरपदासाठी नगरसेवकांसाठी पाच कोटीचा भाव फुटला असल्याचा गंभीर आरोप," शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सेना पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना (ShivSenaUBT) पक्षाचे महापालिका निवडणुकीतील उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच अहिल्यानगर शहर कार्यालयात किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतील सत्ताधारी पक्षांकडून झालेले प्रचंड पैसे वाटप, केलेली मत खरेदी, निवडणूक यंत्रणेकडून नियम धाब्यावर बसवत गैरमार्गाने सत्ताधाऱ्यांना करण्यात आलेली मदत, मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांच्या गैरहजेरीत ईव्हीएम मशीनचे सील तोडून सुरू केलेली मतमोजणी, त्यावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली अरेरावी यासह निवडणूक काळात आलेल्या अनेक अनुभवांचा पाढा बैठकीत वाचला. यावेळी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर देखील उमेदवारांनी तीव्र शंका व्यक्त केली.

निवडणूक आढावा घेतल्यानंतर बोलताना किरण काळे म्हणाले, "ज्या उमेदवारांना दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रभागात कोणी ओळखत नव्हतं, असे काही नवीन लोक निवडून आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिस संरक्षणात सत्ताधाऱ्यांनी पैशांचं वाटप केलं. ज्या उमेदवारांना मागच्या मनपा निवडणुकीत अपक्ष लढतांना हजार पेक्षा जास्त मतं होती, त्यांना विरोधी पक्षांच्या चिन्हावर कमी मतं मिळाली. ही गोष्ट 'ईव्हीएम'च्या (EVM Machine) पारदर्शकतेवर संशय निर्माण करणारी आहे."

'निवडणुकीच्या काळात पैसे वाटपाची स्पर्धा एवढी टोकाला गेली होती की, त्यातून महायुतीतील युती केलेल्या दोन पक्षांनी युती न केलेल्या तिसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या मुंबईतून आलेल्या आणि शहरातील एका बड्या पदाधिकाऱ्याच्या घरी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांची रसद त्यांच्या उमेदवारांना मिळू नये, म्हणून प्रशासनाला छापा मारायला लावला,' असा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला.

'उमेदवारांच्या गैरहजेरीत ईव्हीएमचे सील तोडून परस्पर सुरू केलेली मतमोजणी अत्यंत बोलकी आहे. जनभावना वेगळीच असताना ईव्हीएम मधून मात्,र एक हाती सत्तेचा अनपेक्षित चमत्कार यावेळी अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये मतदारांना पाहायला मिळाला आहे. याचे लोकशाहीवर दुरगामी गंभीर परिणाम होतील,' असे किरण काळे यांनी सांगितले.

महापौरपदासाठी शंभर कोटींहून अधिक रकमेची उधळण

'युतीकडे महापौर पदाचे आठ-नऊ संभाव्य उमेदवार आहेत. महापौरपदासाठी पाच कोटी रुपयांचा भाव फुटल्याची चर्चा शहरात आहे. शंभर कोटींहून अधिक रकमेची उधळण मत खरेदीसाठी केल्यानंतर आणि महापौर पदासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर भरल्यानंतर आगामी काळात मनपाच्या तिजोरीची सत्ताधाऱ्यांकडून दरोडा घालून लूट झाल्या शिवाय राहणार नाही,' असे घणाघात किरण काळे यांनी केला.

भ्रष्ट सत्तेचा काळ पुन्हा सुरू...

अहिल्यानगरच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक आणि आगामी पाच वर्षांचा काळ हा अत्यंत भ्रष्ट सत्ता काळ असणार असल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला कडाडून विरोध करावा, असे आवाहन यावेळी किरण काळे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, डॉ. श्रीकांत चेमटे, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अंबादास शिंदे, प्रतीक बारसे, महिला आघाडीच्या उषा भगत आदी बैठकीला उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT