BJP Shiv Sena tension : बीएमसी रणसंग्राम पेटला! दिल्लीचा आदेश, फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये; शिंदेंची दरे गावाकडे कूच?

BJP–Shiv Sena Power Sharing Tension in BMC Eknath Shinde Leaves for Satara Village : मुंबई महापालिका सत्ता वाटपात भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत होत नसल्याने, तणाव वाढला आहे.
Eknath Shinde Leaves
Eknath Shinde LeavesSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Corporation politics : मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचा पेच वाढतच चाललेला दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने दिवसभर मुंबईत होते. या दोघांमध्ये सत्ता वाटपाचा निर्णय होईल, असे वाटत असतानाच, तसं काही झालं नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबई महापालिकेतील सत्तेत कोणतीही तडजोड करू नका, असा आदेश आहे. या पार्श्वभूमीवर, आज मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक असतानाच, एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरे इथं गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई महापालिकेत भाजप अन् एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेने थेट महापौर पदावर दावा केला आहे. तसेच महापालिकेतील सत्ता वाटपात, समसमान वाटा हवा आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांबरोबर हाॅटेल पाॅलिटिक्स केलं. यामुळे दिल्लीतील सत्ताधीश एकनाथ शिंदे यांच्या या राजकारणावर नाराज आहेत. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीहून मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपात कोणतीही तडजोड स्वीकारून नका, असा आदेश आहे. त्यामुळे फडणवीस देखील अ‍ॅक्शन मोडवर आहेत.

मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक होऊन दहा दिवस होऊन गेले आहे. सत्तेसाठी प्रबळ दावा असलेल्या भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत महापौरपदासह सत्तेतील इतर वाटण्यावरून वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना महापौरपदावर अडून बसली आहे. पण दिल्लीतून मुख्यमंत्री फडणवीस यांना तडजोड न करण्याचा आदेश आहे. यात रविवारी एकनाथ शिंदे सातारा इथल्या त्यांच्या मूळ गाव दरे इथं होते.

Eknath Shinde Leaves
Raigad Mahad municipal election : निवडणुकीतील ‘राडा बॉय’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! पोलिस कोठडीतून बाहेर येताच विकास गोगावलेन विरोधकांना ललकारलं

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला फडणवीस आणि शिंदे मुंबईत होते. परंतु त्यांनी एकमेकांची भेट घेतली नसल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज कॅबिनेटची बैठक आहेत. या बैठकीनंतर किंवा पूर्वी फडणवीस अन् शिंदेमध्ये काय चर्चा होते की, शिंदे बैठकीला गैरहजर राहतात, याकडे लक्ष लागलं आहे. यातच शिंदे हे दरे गाव रविवारी गेल्याने, तिथून काय सूत्र हालली, याची देखील चर्चा आहे.

Eknath Shinde Leaves
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान : राष्ट्रवादी आक्रमक; आता चेंडू CM फडणवीसांच्या कोर्टात

भाजपकडून मुंबई महापालिकेतील एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करावी, असा आग्रह आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे, हे दोघेजण एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक आज दुपारी 29 नगरसेवकांची गटनोंदणी करणार आहेत. हे नगरसेवक आज दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापाशी जमतील. त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन, बसने गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे दावोसवरुन परतल्यानंतर मुंबईत महापालिका सत्ता स्थापनेसाठी प्रचंड अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पण, फडणवीस अन् शिंदे या दोघा नेत्यांची बैठक झाली नाही. काही विशेष हालचाली झाल्या नाहीत. यातच आज एकनाथ शिंदे शिवसेना आपल्या 29 नगरसेवकांची स्वतंत्रपणे गटनोंदणी करणार आहेत. यावरुन मुंबईच्या महापौरपदाबाबत, स्थायी समितीच्या सभापतीबाबत आणि इतर सत्ता वाटपाबाबत भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत होत नसल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com