Bharati Pawar news : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा फटका बसणार आहे.
शेतकरी आणि कांदा प्रश्नांवर विरोधकांनी भाजपला टार्गेट केले आहे. याच प्रश्नांवरून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील बचावात्मक भूमिका घेताना दिसतात. अशातच पक्षाचे माजी खासदार चव्हाण यांनीही कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर गेल्या पाच वर्षात कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे जाहीर केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार चव्हाण यांनी गेल्या महिन्याभरात दिंडोरी मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारसंघाचे प्रश्न आणि पक्षाकडून झालेले दुर्लक्ष याबाबत आपली व्यथा मांडली. चव्हाण यांच्या समर्थकांनाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फारसे महत्त्व दिलेले नव्हते. गेल्या पाच वर्षांत एकदाही आपली आठवण पक्षाला झालेली नाही. भारत पवार(Bharati Pawar) यांना आपण पाठिंबा देऊन निवडणुकीत सहकार्य केले. मात्र खासदार झाल्यावर डॉ पवार यांनी कोणत्याही बॅनरवर आपला फोटो सुद्धा लावलेला नाही. त्यांचा कोणताही संपर्क नाही. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर उमेदवारी करीत असल्याचे माजी खासदार चव्हाण यांनी सांगितले.
आज माजी खासदार चव्हाण यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात विविध समर्थकांनी गेल्या पाच वर्षांत पक्षाकडून कार्यकर्ते आणि चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना पक्षात कोणीही महत्त्व दिले नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही उपेक्षा झाली आहे. या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारी करावी, असा आग्रह धरला. समर्थकांच्या आग्रहाखातर माजी खासदार चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्याचा फटका भाजपला बसणार आहे.
माजी खासदार चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला धक्का बसला आहे. विशेषतः केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उमेदवारीला त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपचे(BJP) महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांनी आज माजी खासदार चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांनी उमेदवारी करू नये, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनीही चव्हाण यांना उमेदवारी दाखल करू नये अशी विनंती केली. मात्र चव्हाण आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात भाजपला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.