Radhakrishna Vikhe : 'शरद पवारांना आता विस्मरण', मंत्री विखे पुन्हा बरसले!

Lok Sabha Election : दहशत, गुंडगिरी, अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार', असा टोला नीलेश लंके यांचे नाव न घेता विखे यांनी लगावला आहे.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama

भाजपचे स्टार प्रचारक तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुन्हा एकदा शरद पवारांवर गरजले आहेत. शरद पवारांना मंत्री विखेंनी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. आता त्यांना विस्मरणाचा त्रास होतो आहे. नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाटोळे कसे केले हे पटवून देवू, असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

मंत्री विखे यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी उसंत न घेता काम सुरू ठेवले आहे. गाठीभेटीवर भेट देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सहा मे रोजी होत असलेल्या सभेचे नियोजन सध्या सुरू आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेत आहेत.तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारातही त्यांनी पुढाकार घेतला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (Nagar Loksabha Constituency) जागा शरद पवार यांनी यावेळी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे कांटे की टक्कर होताना दिसत आहे. शरद पवार यांनी देखील उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारात कोणतीही कसर सोडलेले नाही. यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिण काबीज करण्यासाठी शरद पवार जीवाचे रान करत आहे. यातून विखे आणि पवार यांचा संघर्ष सुरू झाला आहे. मंत्री विखे यांनी शरद पवारांवर Sharad Pawar पुन्हा तोफ डागली आहे.

Radhakrishna Vikhe
Chhagan Bhujbal news: भुजबळ समर्थक खैरे महायुतीचा खेळ बिघडवणार?

मंत्री विखे म्हणाले, 'पद्मश्रीच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. शरद पवारांना आता विस्मरण होऊ लागले. यामुळे त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाट्टोळे केले, हे त्यांना पटवून देवू. नगर जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे (Balasaheb Vikhe) पाटील यांनी आठ वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला सात वेळा आमदार म्हणून निवडून दिले. पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे हे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू असून सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक संधी परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी कारणी लावली आहे'. जिल्ह्याच्या विकासकामात नेहमी अडसर निर्माण केली. जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही, त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

या चर्चेत पवारांनी जिल्ह्याचे कसे नुकसान केले, हे आपण त्यांना पटवून देवू. पवारांमुळे जिल्ह्याचे पाणी गेले. शेतकरी संकटात आला. जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. त्यांचे जिल्ह्यासाठी काय योगदान आहे. एकदा तरी सांगावे, असा सरळ सवाल मंत्री विखे यांनी केला. त्याच्यांमुळे जिल्ह्याला किती अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांना पटवून देण्याची माझी तयारी आहे, असे विखे यांनी म्हटले.

दरम्यान, विखे यांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवाराने पोलिसांवर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. '‘साध्या माणसाचा खरा चेहरा’ आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी, अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार', असा टोला मंत्री विखे यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला आहे.

Radhakrishna Vikhe
Karale Guruji On Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावरून कराळे गुरूजींचे टोमणे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com