Teacher Bribe News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Teacher Bribe News : धक्कादायक! चक्क मुख्याध्यापिकेने घेतली शिक्षकाकडून लाच; अडकल्या ACB च्या जाळ्यात...

Bribe News Dhule : पाच हजार रुपये हातावर टेकवा तरच फाईल क्लिअर..

संपत देवगिरे

Dhule News : शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता जवळपास शिष्टाचार झाला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या लाचखोरीचे प्रकरणं सतत पुढे येत आहेत. याबाबत सातत्याने नवे प्रकार पुढे येत असल्याने शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस या गावातल्या आदिवासी प्रकल्प शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेस लाच घेताना अटक झाल्याने आता तो चर्चेचा विषय बनला आहे. (Latest Marathi News)

शिक्षक राजेंद्र चौधरी हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या गटविमा योजनेतील बिल मंजूर करण्यासाठी कोषागार कार्यालयात फाईल पाठविणे आवश्यक होते. शाळेकडून त्याला मंजुरी मिळावी यासाठी ते मुख्याध्यापिकेकडे पाठपुरावा करीत होते. गटविमा योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापिका जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती, त्यावर तडजोड होऊन चार हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

मुख्याध्यापिका जगताप यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या कार्यालय आणि घरी तपासणी केली. एसीबीच्या निरीक्षक रूपाली खांडवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागातील मुख्याध्यापिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे झालेली ही कारवाई आहे.

नाशिकच्या एसीबी पथकाने मावळत्या वर्षात 165 होऊन अधिक सापळे यशस्वी केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुनीता धनगर आणि अन्य कारवाईंचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. शिक्षण विभागातील गैरप्रकारांमुळे हा विभाग सातत्याने चर्चेत आहे. नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्याध्यापिकेस लाच घेताना कारवाई झाल्याने येत्या वर्षभरात काय घडेल ही उत्सुकता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT