Bjp New Party Office News : ...अखेर वनवास संपला! पुण्यात भाजप थाटणार हक्काचं 'हायटेक' ऑफिस

BJP will be established Hi-tech office in Pune : निवासस्थानासह उपलब्ध असणार सर्व अद्यावत सोयीसुविधा
Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Dhiraj Ghate
Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Dhiraj GhateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) हक्काचे, स्वतःच्या मालकीच्या कार्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कार्यालय बांधण्यासाठी शहर भाजपने डीपी रोडवर आठ ते दहा गुंठे जागा घेतली असून पुढील काही दिवसात पक्षाचे हक्काचे कार्यालय उभारण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पुढील काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने सध्या भाजपने डीपी रोडवर एका भाड्याच्या जागेत आपले कार्यालय सुरु केले आहे.

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून सध्या भाजपची ओळख आहे. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत भाजपने विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. दहा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर प्रत्येक शहरात भाजपचे कार्यालय असावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती.

पुणे शहरात भाजपचे प्रशस्त असे कार्यालय नसल्याने कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी पाच- सहा वर्षापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात पक्षाचे बुधवार पेठेतील कार्यालय जंगली महाराज रस्त्यावरील हॅाटेल सन्मान येथे हलविले. महापालिका निवडणुकीचा संपूर्ण प्रचार याच कार्यालयातून करत भाजपने महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Dhiraj Ghate
Pandharpur Assembly Election : प्रशांत परिचारक वाढविणार भाजपचे टेन्शन; विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटले...

पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार या कार्यालयातून करत भाजपचे चक्क 98 नगरसेवक निवडून आले. या वास्तूच्या माध्यमातून पक्षाला चांगले यश मिळाल्याने हेच आता भाजपचे कायमस्वरुपी पक्ष कार्यालय होईल, अशी जोरदार चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. मात्र त्यानंतर हे कार्यालय सोडावे लागले. पुणे महापालिकेच्या बाजुला असलेल्या एका इमारतीमध्ये भाजपचे पक्ष कार्यालय हलविण्यात आले. त्यावेळी शहराध्यक्ष म्हणून माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे जबाबदारी होती.

पक्षाची नगरसेवक संख्या मोठी असतानाही तसेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाही पक्षाला स्वतःचे कार्यालय सुरू करण्यासाठी हक्काची जागाच मिळत नसल्याने पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांच्या कर्तृत्वावर शंका व्यक्त केली जात होती. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला हक्काचे कार्यालय मिळत नसल्याने 'कोणी कार्यालय देता का कार्यालय' अशी म्हणण्याची वेळ पक्षाच्या नेत्यांवर आली असल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते.

पक्षाचे हक्काचे कार्यालय उभारण्याचा संकल्प आता शहर पातळीवरील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोडला आहे. यासाठी आवश्यक असलेल्या जागेची खरेदी देखील झाली असून पुढील काही वर्षांमध्ये अद्यावत असे पक्ष कार्यालय उभारले जाणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस राघवेंद्र उर्फ बापू मानकर आणि कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी सांगितले. 34 बुधवार पेठ येथे भाजपचे हक्काचे कार्यालय असून पक्षाचा वाढता विस्तार आणि कार्यकर्त्यांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता हे नवीन कार्यालय उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हात्रे पुलापासून जवळच हे नवीन कार्यालय बांधले जाणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांना राहण्यासाठी निवासस्थान, पदाधिकारी, शहरातील नेते यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिन, वाहनांच्या पार्किंगसाठी मोठी व्यवस्था येथे उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Dhiraj Ghate
Ncp Mlas Disqualification : राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात मोठी माहिती समोर; राजकीय घडामोडींना वेग येणार

या नवीन कार्यालयाबाबत अधिक माहिती 'सरकारनामा'ला देताना जोशी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्यावत असे पक्ष कार्यालय भाजपचे असणार आहे. हे पक्षाचे परमनंट कार्यालय असेल. प्रत्येक शहरात पक्षाचे कार्यालय असावे, अशी भूमिका वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची आहे. मात्र इतर पक्षांप्रमाणे कोणताही वाद निर्माण करून किंवा जबरदस्ती करत, दम देऊन आम्ही जागा मिळवित नाही. शुद्ध व्यवहार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे भाजपचे हक्काचे कार्यालय होण्यास विलंब झाला. चांगला व्यवहार आणि आम्हाला परवडेल अशा दराने ही जागा आम्हाला मिळाली आहे. आठ ते दहा चौरस फुट जागेत हे कार्यालय उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Dhiraj Ghate
Jitendra Awhad: '...तेव्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं ही आमची चूकच' ः जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com