Kadwa election celebration & Shreeram Shete news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कादवा साखर कारखान्याचे बॅास श्रीराम शेटेच, विरोधकांना भोपळा!

कादवा साखर कारखान्यामध्ये श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनेलने सर्व जागा जिंकल्या.

Sampat Devgire

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadwa Sugar Factory) निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे (Shreeram Shete) यांच्या कादवा विकास पॅनलने सर्व १७ जागा जिंकत इतिहास रचला. विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) नेते श्रीराम शेटे हेच कादवाचे `बॅास` ठरले. (Kadwa election news)

कादवा कारखाना निवडणुकीत कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. कादवा पॅनलचे नेतृत्व श्रीराम शेटे, तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अ‍ॅड. बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांनी केले. सर्वांत प्रथम निकाल उत्पादक, बिगरउत्पादक सहकारी संस्था गटाचा लागला. त्यात विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे २६ मतांनी विजयी झाले. संपतराव वक्ते यांना अवघी नऊ मते मिळाली. कादवा विकास पॅनलने श्रीराम शेटे यांच्या विजयाची गुढी उभारल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. तो शेवटच्या गटाच्या मतमोजणीपर्यंत कायम राहिला. प्रत्येक गटात कादवा विकास पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी मिळविल्याने सर्वच उमेदवार विजयी झाले.

दरम्यान, पारदर्शक कारभार, काटकसर, उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव, उसाच्या क्षेत्रात झालेली वाढीमुळे कादवा विकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिल्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी म्हटले आहे. तर हा धनशक्तीचा विजय असून, आम्हाला मिळालेली सर्व मते ही ऊस उत्पादकांची आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. चुकीच्या प्रवृत्तीतून लोकांनी मतदान केले असले, तरी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे परिवर्तन पॅनलप्रमुख सुरेश डोखळे यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव सुरू असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलने सर्वच्या सर्व सतरा जागा जिंकत इजिहास रचला आहे. मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता पुन्हा सत्ता दिल्याने त्यांनी मतदारांचे आभार मानत कारखान्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे अभिवचन सभासदांना दिले.

कादवा कारखाना निवडणुकीत कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. कादवा पॅनलचे नेतृत्व श्रीराम शेटे तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अ‍ॅड. बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांच्याकडे होते. अटीतटीच्या निवडणुकीत ९३ टक्के विक्रमी मतदान झाल्याने वाढलेली आकडेवारी कुणाला तारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या निकालाची सुरवात सर्वात आधी उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था गटाच्या निकालाने झाली. यात विद्यमान अध्यक्ष श्रीराम सहादू शेटे २६ मतांनी विजयी झाले. संपतराव भाऊसाहेब वक्टे यांना अवघी ९ मते मिळाली.

कादवा विकास पॅनलने श्रीराम शेटे यांच्या विजयाची गुढी सर्वात आधी उभारल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. तो शेवटच्या गटाच्या मतमोजणीपर्यंत कायम राहिला. प्रत्येक गटामध्ये कादवा विकास पॅनलच्या उमेद्वारांनी आघाडी मिळवल्याने सर्वच्या सर्व उमेद्वार या निवडणुकीत विजयी झाले. सोसायटी गटातील निवडणूक निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांना पुढील निकाल आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा वाढत एक एक कार्यकर्ता वाढतच गेला. एकेका गटाचा निकाल विकास पॅनलच्या बाजूने लागत असतानाच घोषणा व गुलालाची उधळण परिसरात सुरू होती. दरम्यान मतमोजणीस्थळी श्रीराम शेटे उपस्थित होताच जय श्रीराम, श्रीराम शेटेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कादवा विकास पॅनलचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

कामकाजावर विश्‍वास ठेऊन सभासदांनी कादवा विकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवू. भविष्यात कादवाची गाळपक्षमता वाढवून चार हजार टनापर्यंत वाढवू. `सीएनजी`चा प्रकल्पही मार्गी लावला जाईल.

- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा कारखाना

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT