Shrikant Shinde at Ayodhya Railway Station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrikant Shinde at Ayodhya: मुख्यमंत्री योगी आणि शिंदे भेट हा आजचा शुभ योग!

खासदार श्रीकांत शिंदे यांनी अयोध्येत शिवसेना नेते संजय राऊतांवर टिका केली

Sampat Devgire

Shivsena Ayodhya tour welcome : आज पहाट झाली. अत्यंत उत्साह आहे. एव्हढा उत्साह आम्ही कधी पाहिला नव्हता. प्रदिर्घ प्रवास करून देखील शिवसेनेचे कार्यकर्ते उत्साही आहेत. वेगळा उत्साह यंदाच्या अयोध्या दौऱ्यात आहे. कोणतिही विशेष शिवसेना कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी आली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अयोध्येत स्वागताला असतात. आज आम्ही सर्व पदाधिकारी आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी आहोत, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. (CM Eknath Shinde reached in Ayodhya with all 50 MLAs)

यावेळी पक्षाचे (Shivsena) मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांसह ठाण्याचे (Thane) विविध नेते उपस्थित होते. विशेष रेल्वे गाडीने नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कार्यकर्ते आज पहाटे अयोध्या (Ayodhya) रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी त्यांचे स्वागत शिवसेनेचे खासदार शिंदे (Shrikant Shinde) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

यावेळी रेल्वेस्थानकावर फलक तसेच भऱगच्च ध्वज लावण्यात आले होते. स्वागताचे फलक होते. भोंगे लावण्यात आले होते. यासंदर्भात रोज सकाळी शिवसेना नेते खासदार राऊत विरोधकांवर आणि विशेषतः शिंदे गटावर टिका करीत असतात. त्या भोंग्यांचा उल्लेख करीत, `इथेही भोंगे आहेत` अशी विचारणा पत्रकारांनी केली. त्यावर ते म्हणाले, हे अयोध्येतील शिवसेनेच्या स्वागतासाठीचे पवित्र व चांगले भोंगे आहेत. हे भोंगे कोणी झोपेत असतील तर त्यांना निश्चित जागे करतील, यात शंका नाही.

यासंदर्भात ते म्हणाले, आज अयोध्येत मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. सकाळी ते रामलल्लांचे दर्शन घेतील. यावेळी त्यांच्या समवेत सर्व मंत्री आणि आमदार असे पन्नास लोक असतील. मंत्री मंडळातील सहकारी गिरीष महाजन देखील असतील. त्यानंतर हनुमान गढीला जाऊन ते दर्शन घेतील. विविध साधु संतांचे आर्शिवाद देखील घेतील. सायंकाळी शरयु घाटावर आरतीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर महंतांच्या आर्शिवादाचा कार्यक्रम होणार आहे.

आज अयोध्येत दिवसभराचा भऱगच्च असा कार्यक्रम आहे. सर्व अयोध्यावासी तसेच महाराष्ट्रातून आलेले तसेच येथील स्थानिक कार्यकर्ते त्याबाबत उत्सुक आहेत. एक वेगळी उर्जा या दौऱ्यातून सगळ्यांना निश्चित मिळेल.

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन चर्चीत मुख्यमंत्र्यांची भेट होते आहे. याबाबत काय वाटते या प्रश्नावर ते म्हणाले, ही खुपच चांगली गोष्ट घडते आहे. अयोध्येतील ही भेट हा शुभ योग आहे. त्यातून खुप विषयांची अदान, प्रदान होईल. उत्तर प्रदेशचे अनेक लोक महाराष्ट्रात व महाराष्ट्रातील अनेक लोक उत्तर प्रदेशात राहतात. त्यांचे विविध प्रश्न आहेत. ते यानिमित्ताने सुटू शकतात. काय चांगलं करता येईल, हे खुप महत्त्वाचे.

प्रभु रामचंद्रांच्या आर्शिवादानेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आले आहे. श्रीरामांच्या आर्शिवादानेच आपल्याला शिवसेनेचा धनुष्यबाण मिळाला आहे. यापुढेही राज्यात चांगली कामे होवोत आणि राज्याचा विकास व्हावा हेच आमचे अयोध्येत मागणे असेल, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT