Eknath Shinde News : २०१९ मधील चूक सुधारली; लखनौला पोहचताच मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Ayodhya Tour : अयोध्येतील राम मंदीर म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नपूर्ती
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Reached Lucknow : अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी मुंबईहून लखनौसाठी रवाना झाले होते. ते रात्री आठच्या सुमारास लखनौ येथे पोहचले. तेथे मुख्यमंत्री शिंदे यांचे ढोल-ताशांच्या गजरात व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्र्यांच्या उपस्थित स्वागत केले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्वागतासाठी केलेली तयारी आणि वातावरण पाहून भारावलो असल्याचे भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "मुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमित आलो आहे. येथे दोन तीन दिवसांपासून उत्साह आहे. येथे रामभक्तांनी संपूर्ण भगवे, हिंदुत्वाचे वातावरण केले आहे. या प्रभू रामचंद्राच्या भूमिवर मी नतमस्तक होतो."

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde Reached Lucknow : भगवं वातावरण अन् ढोल-ताशांचा गजर; मुख्यमंत्री शिंदेंचे लखनौत जंगी स्वागत

अयोध्या येथील राम मंदिरामुळे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि लाखो रामभक्तांचे स्वप्न साकार झाल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, "अयोध्या आमच्यासाठी भावना, श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे. अयोध्येत रामाचे मंदिर असावे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यानुसार येथील मंदिराचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. या मंदिरामुळे बाळासाहेबांसह लाखो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे."

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Vikhe Patil on Sharad Pawar : राधाकृष्ण विखे पाटलांची पवारांवर खोचक टीका; म्हणाले, अभ्यास करून..

यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "सरकार स्थापनेसाठी २०१९ मध्ये हिंदुत्व सोडले होते. त्यानंतर आम्ही २०१९ मध्ये झालेली चूक सुधारली आहे. भाजप-शिवसेनेचे भूमिका एक आहे. आमचे विचार एक आहेत. राज्यात आम्ही चांगले काम करत आहे. पूर्वाच्या राज्यात साधूंची हत्या झाली, तशी या राज्यात होणार नाही."

दरम्यान, लखनौ विमातळ परिसरात मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी दिसून आली. त्यावेळी उपस्थितांनी 'जय श्री राम' अशा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्र्यासंह आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचेही पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com