Jalgaon Market Committee Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon APMC News News : जळगाव बाजार समिती सभापती निवडीत आघाडीतच घमासान; पण, भाजप-शिवसेनेच्या मदतीने झाला विजय

Bazaar Samiti News : जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीच्याच उमेदवारात घमासान झाले.

कैलास शिंदे

Jalgaon Market Committee News : जळगाव बाजार समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीच्याच उमेदवारात घमासान झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी आघाडीचेच दुसरे उमेदवार श्‍यामकांत सोनवणे यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच सभागृहातही दमदाटी करून हात उंच करून मतदान करावयास लावल्याचा गंभीर आरोप केला.

मात्र, हा आरोप श्‍यामकातं सोनवणे यांनी फेटाळाला आहे. सभापती निवडीत महाविकास आघाडीचे श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात मतदान होवून श्‍यामकांत सोनवणे हे अठरा पैकी पंधरा मते घेवून विजयी झाले. तर उपसभापतीपदी महाविकासचे पांडूरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या संचालकांची मतेही महाविकासचे श्‍यामकांत सोनवणे यांना मिळाल्याने महाविकास आघाडी व भाजप-शिंदे गटाच्या एकीचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जळगाव (Jalgaon) कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीसांठी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभागृहात तालुका उपनिबंधक (सहकार ) यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होते. अठरा संचालकांत महाविकास आघाडीचे अकरा तर भाजप (BJP) सेनेचे सहा तर एक अपक्ष संचालक आहेत. महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) बहुमत असल्याने त्यांचा सभापती होणार हे निश्‍चित होते. महाविकासचे नेते माजी मंत्री राष्ट्रवादी चे नेते गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत बैठक होवून पहिल्य वर्षी श्‍यामकात सोनवणे यांना तर पुढील वर्षी लक्ष्मण पाटील यांना सभापतीपदासाठी संधी देण्याचे निश्‍चित झाले होते.

संचालक मंडळाच्या सभागृहात पीठासीन अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या उपस्थितीत प्रक्रीया सुरू झाली. तेंव्हा सभापतीपदासाठी श्‍यामकांत सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील यांनीही अर्ज दाखल केला. आणि तेथूनच वाद सुरू झाला. लक्ष्मण पाटील यांनी सांगितले, अर्जच दाखल करू नये म्हणून आपल्याला महाविकाचे उमेदवार श्‍यामकांतसोनवणे यांनी दमदाटी केली, आपल्याला शालकासही दोन चापटी मारल्या. तसेच गोकुळ चव्हाण यांचा अर्जही सोनवणे यांनी फाडून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ते सभागृहाबाहेर निघून गेले.

सभापतीपदासाठी महाविकास आघाडीतर्फे श्‍यामकातं सोनवणे, लक्ष्मण पाटील तर भाजप-सेनेच्या गटातर्फे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. माघारीच्या वेळेत प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज माघार घेतला, त्यामुळे महाविकास चे श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात लढत होवून मतदान झाले. मतदानासाठी लक्ष्मण पाटील पुन्हा सभागृहात आले. मतदान खुल हात उंच करून घेण्यात आले. यात श्‍यामकांत सोनवणे यांना पंधरा तर लक्ष्मण पाटील यांना तीन मते पडली. विशेष म्हणजे भाजप-सेना गटाची सहा मतेही श्‍यामकांत सोनवणे यांना मिळाली. श्‍यामकातं सोनवणे सभापतीपदी विजयी झाले तर उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीचे पांडूरंग पाटील हे बिनविरोध झाले.

हाणामारी नव्हे शाब्दीक वाद : देवकर

महाविकास आघाडीचे गटनेते गुलाबराव देवकर यांनी सांगितले, कि कोणतीही हाणामारी झाली नाही. श्‍यामकातं सोनवणे व लक्ष्मण पाटील हे प्रबळ दावेदार असल्याने त्यांच्यात शाब्दीक वाद झाला परंतु आम्ही पहिल्या वर्षी श्‍यामकातं सोनवणे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज दोघांनी टाकण्याचा ठरले नंतर लक्ष्मण पाटील उमेदवारी माघार घेणार होते. मात्र, त्यांना वेळ न मिळाल्याने त्याचा अर्ज राहिला. आम्ही भाजप-शिंदे गटाचे सहकार्य मागितले नव्हते त्यांनी दिले आहे. श्‍यामकांत सोनवणे सभापती झाले आहेत. पुढील वर्षी ते राजीनामा देतील, त्यानंतर लक्ष्मण पाटील यांना संधी सभापतीपदाची संधी देण्यात येईल. लक्ष्मण पाटील यांचा वाद मिटला असून त्यांनी श्‍यामकांत सोनवणे यांचे अभिनंदन केल्याचेही देवकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT