Simhastha Kumbh Mela 2027 News update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela 2026: कुंभमेळ्यातील राजकारण! गिरीश महाजनांच्या निर्णयावर साधू-महंत प्रसन्न; काय आहे कारण?

Kumbh Mela Infrastructure 2026: सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे एक समीकरण आहे. गेल्या महिन्याभरापासून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर साधू भलतेच संतापले होते. आता अचानक ते खुश झाले आहेत. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया

Sampat Devgire

Funding for Nashik Simhastha Kumbh Mela 2026-27: मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आखाड्यांच्या साधूंसाठी प्रत्येकी 10 खोल्या बांधकामाचे निर्णय घेतले आहे. मंत्री महाजन यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले. यावेळी सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचा विविध अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्यासाठी प्रत्येक आखाड्याच्या परिसरात कोट्यवधीचे काम होणाऱ्या असल्याने साधू खुश झाले आहे.

जुना आखाडा. महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा, आवाहन आखाडा, निरांजनी आखाडा, आनंदा आखाडा, निर्मला आखाडा, अग्नी आखाडा, नया आणि जुना उदासीन अशा दहा आखाड्यांच्या आवारात साधूंच्या निवासस्थानासाठी सरकारनतर्फे खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे या साधूमध्ये सरकारला नमवल्याचे समाधान आहे.

मंत्री महाजन यांनी साधूंची नाराजी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता प्रत्येक आखाड्यात सुमारे एक कोटी रुपयांचे बांधकाम होणार आहे. त्याचे भूमिपूजन साधूंच्या उपस्थितीतच झाले. त्यासाठी जुना आखाड्याचे महंत हरीगिरी आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत रवींद्र पुरी, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांसह विविध महंत आणि साधू मंडळी यावेळी उपस्थित होते. पुरेशा कालावधी आधीच या कामांना सुरुवात झाली आहे.

प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळा मध्ये त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या विविध मागण्या असतात. मागण्यांवरून साधू आणि प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगतो. यंदाही अशीच असते ती निर्माण झाली होती. या आखाड्यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यात चर्चेतून तोडगा काढत बांधकामांना मंजुरी दिल्याने साधू मंडळी पहिल्या टप्प्यात प्रशासनाला नमवले या भावनेने खुश आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा मंत्री यांनी सातत्याने कुंभमेळ्यासाठी तीस हजार कोटींचे कामे हाती घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या साधूंच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यासाठी त्यांनी बैठक घेऊन सरकारवर नाराजी व्यक्त केली होती.

या साधूंनी सरकार आणि प्रामुख्याने कुंभमेळा प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी असहकार सुरू केला होता. यातील काही साधूच प्रशासनाची बाजू घेताना दिसले. काहींनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपला प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे साधूंमध्येही रंगलेले राजकारण ओळखून मंत्री महाजन यांनी साधूंची अचूक नस पकडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT