Sunetra Pawar: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून जयंत पाटील भाजपवर संतापले

Jayant Patil ON Sunetra Pawar swearing: शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'जे हिंदू हिंदू बोलून मतं मागतात त्यांना लाजलज्जा राहिलेली नाही,' अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
Sunetra Pawar Oath as DCM
Sunetra Pawar Oath as DCMSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil ON BJP criticism: उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या घाईगडगबडीबाबत भाजपसह विरोधकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावरून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'जे हिंदू हिंदू बोलून मतं मागतात त्यांना लाजलज्जा राहिलेली नाही,' अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

उपमुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपद नव्हते, त्यामुळे 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचे हिंदुत्व सोयीनुसार असतं, असेही जयंत पाटील म्हणाले.

अजितदादांच्या निधनाचा दुखवटा पूर्ण न होता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे अयोग्य आहे, असे म्हणणाऱ्यांना प्रफुल्ल पटेल यांनीही पत्रकार परिषदेत सुनावले होते. पटेल म्हणाले की, अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनीच नेतृत्व करावे, असा सर्वांचा आग्रह आहे. तसेच, तीन दिवसांचा शोक पाळणे ही पवार कुटुंबाची परंपरा असल्याने चौथ्या दिवशी आम्ही शपथविधी केला.

आम्ही तात्काळ निर्णय घेतला, कारण असा विषय अनेक दिवस प्रलंबित ठेवता येत नाही. दुसरे म्हणजे, पक्षाला स्थिरता आणि दिशा देणे आवश्यक आहे. पक्षाच्या सर्व आमदारांसह कार्यकर्त्यांना असे वाटले की, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पटेल म्हणाले, "अजितदादा अनेक वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष आहेत, आणि आता ही जबाबदारी योग्य प्रकारे पुढे नेली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यासोबतच, आम्हाला पक्षाच्या अध्यक्षांबाबतही निर्णय घ्यायचा होता, आणि आम्ही ती प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे,"

Sunetra Pawar Oath as DCM
Tanaji Sawant Warns: माझा नाद नाय करायचा! थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो; तानाजी सावंतांचा बंडखोर उमेदवाराला दम

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते आज या दुःखातून जात आहे. अजितदादा जो राजकीय वारसा आहे आणि कार्यकर्त्यांची एकजूटीचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा असणार आहे. आमच्या पक्षातील एकाही नेत्याने याला विरोध केला नाही. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com