Agriculture Officer Annasaheb Gagare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar ACB trap News: कृषी अधिकारी गागरे यांना ५० हजारांची लाच घेताना अटक

पुरवठादाराकडून चार लाखांची लाचेची मागणी करून ५० हजार घेताना कारवाई झाली.

Sampat Devgire

Agriculture Officer arrest news : शेतकऱ्यांना लागणारी अवजारांचे उत्पादन करणाऱ्या पुरवठादाराकडून शासकीय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुरवठा व्हावा. त्याला मान्यता देण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेतल्याने तालुका कृषीअधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे यांना `एसीबी`च्या पथकाने अटक केली. (Sinnar police registered a case against Agriculture officer)

कारखानदाराकडून (Agriculture) त्याने शेतकऱ्यांना (Farmers) वितरित केलेल्या उत्पादनांवर सरकारी सबसिडी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सिन्नरचे (Sinnar) तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे यांना शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

सिन्नर कृषी विभागाच्या कार्यालयात पुरवठादार व कृषी अवजारांचे उत्पादक अनुदानासाठी मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यांची अवजारे दर्जेदार होती. त्यामुळे शासनाच्या योजनेंतर्गंत होणाऱ्या पुरवठ्यासाठी त्यांना मान्यता मिळावी यासाठी सिन्नर येथे तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले अण्णासाहेब गागरे (वय ४२) यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता.

श्री. गोगरे यांच्याकडे निफाड तालुक्याचा देखील अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदार यांचा सिन्नर औद्योगिक वसाहतीत शेती यंत्र व अवजारे उत्पादित करण्याचा कारखाना आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या शेती यंत्र व अवजारांवर शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु श्री. गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडी अंती दोन लाख रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. व त्यातील पहिला हफ्ता पन्नास हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी सायंकाळी श्री. गागरे यांना नाशिकच्या एसीबी विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT