Rajabhau-Waje-Uday-Sangle-Manikrao-Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar Politics: एकनाथ शिंदे, गिरीश महाजन सिन्नरचा फड गाजवून गेले, माणिकराव कोकाटे घरच्या मैदानात केव्हा उतरणार?

Sinnar Election Minister Manikrao Kokate away from campaigning, Girish Mahajan, Eknath Shinde's meeting-सिन्नर नगरपालिका निवडणुकीत पुन्हा खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वर्चस्वाची परीक्षा

Sampat Devgire

Vaje Vs Kokate News: सिन्नर नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा रंग भरला आहे. यंदा चौरंगी लढत होत आहे. यामध्ये पारंपरिक खासदार वाजे विरुद्ध क्रिडा मंत्री कोकाटे यांच्यातील लढत चर्चेचा विषय आहे.

सिन्नर नगरपालिकेच्या राजकारणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची झलक आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. यात मतदारांचा कल मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच उमेदवार असून यामध्ये माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले (माणिकराव कोकाटे), प्रमोद चोथवे (राजाभाऊ वाजे), हेमंत वाजे (भाजप) आणि नामदेव लोंढे (एकनाथ शिंदे) या चौघांमध्ये चुरस आहे. किशोर देशमुख हे भाजपचे बंडखोर भाजपच्या उमेदवाराला किती डॅमेज करतात हे महत्त्वाचे असेल.

सिन्नर नगरपालिका निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे. भाजपाच्या उदय सांगळे यांना पाठिंबा देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन येथे प्रचार करून गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सभा गाजवली. खासदार वाजे घरोघर फिरून प्रचार करीत आहेत. मात्र क्रीडा मंत्री कोकाटे अद्याप प्रचारासाठी सिन्नरला फिरकलेच नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पॅनल ची सर्व सूत्रे क्रीडामंत्री कोकाटे यांच्याकडे आहेत. त्यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे प्रचारात दिसतात. मात्र कोकाटे अद्याप प्रचारापासून दूर आहेत. कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय आहे.

सिन्नर शहरात खासदार वाजे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आहे. त्यांना आपली सत्ता राखणे प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्यांना ताकद दिली आहे. घरोघर जाऊन प्रचार होत आहे. नगरपालिकेवर वर्चस्व टिकविणे वाजे यांना राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे.

सिन्नर शहरात लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये वाजे यांनी मतांमधून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांचे सहकारी उदय सांगळे त्यांच्या विरोधात गेले आहेत. यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सांगळे यांचा फटका प्रामुख्याने वाजे यांना बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या अर्थाने चर्चेत आली आहे.

क्रीडा मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे हे सिन्नरच्या राजकारणात परस्परांचे विरोधक आहेत. प्रदीर्घ काळानंतर उदय सांगळे यांच्या निमित्ताने तिसरा भिडू त्यात प्रवेश करीत आहे. नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यात कोण बाजी मारतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT